हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यातील तापमान हे जास्त आणि उष्ण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कालचा बुधवार हा पुण्यातील हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता, लोहेगावच्या स्वयंचलित हवामान केंद्राने (AWS) 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले, जे हंगामातील सर्वोच्च तापमान होते. शिवाजीनगरच्या एडब्ल्यूएसमध्ये 41.2 अंश तापमानाची नोंद झाली, जी या भागासाठी एक नवीन उच्चांक होती. आता पुण्यासाठी 17 ते 22 एप्रिल 2025 दरम्यान तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अहवालानुसार, या दरम्यान तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. तापमानात सतत वाढ झाल्याने पुण्याचे तापमान अनेक भागात 41°C पेक्षा जास्त राहील. लोहगाव 43°C, शिवाजीनगर 42°C, कोथरूड 41°C+, डेक्कन 42°C, चिंचवड 42-43°C, असा हा अंदाज आहे. गुजरातमधून येणारी गरम हवा आणि कोरडी माती यामुळे तापमानात वाढ झाली आहे. दुसरे, पावसाचा अभाव आणि एल नीनो प्रभावामुळे हवामान अधिक उष्ण आणि दमट झाले आहे. तीव्र उष्णतेमुळे डिहायड्रेशन, हीटस्ट्रोक आणि मांसपेशींमध्ये पेटके येण्याचा धोका आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Mumbai Lake Water Level: मुंबईमध्ये लवकरच पाणीकपात जाहीर होणार? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 30.24% पर्यंत घसरला, उच्च तापमानामुळे जलद बाष्पीभवन ही प्रमुख चिंता)
Severe Heatwave Alert for Pune:
Severe heatwave for PUNE 🟠
17-22 April, 2025 | 43°C+ Alert🌡️
Consistent rise in temperatures will keep Pune's temperatures above 41°C.
Lohegaon 43°C, Shivajinagar 42°C, Kothrud 41°C+, Deccan 42°C, Chinchwad 42-43°C. pic.twitter.com/8xq1Ln9HKs
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) April 17, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)