Bank | Edited Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँक यांचा S&P Global Market Intelligence 2025 च्या जगातील टॉप 100 सर्वात मोठ्या बँका (मालमत्तेच्या आधारे) या यादीत समावेश झाला आहे. या यादीत स्थान मिळवणाऱ्या या दोनच भारतीय बँका आहेत. अहवालानुसार, SBI ने चार स्थानांची झेप घेत 43व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर HDFC बँकेने एक स्थान वर जाऊन 73वा क्रमांक मिळवला आहे. यामुळे दोन्ही बँकांनी जागतिक बँकिंग क्षेत्रात आपले मजबूत स्थान सिद्ध केले आहे.

जगातील टॉप 100 सर्वात मोठ्या बँकांची ही यादी बँकांच्या एकूण मालमत्तेच्या आधारावर तयार केली जाते आणि जागतिक स्तरावर बँकांच्या आकारमानाचे प्रतिबिंब दाखवते. ज्यामध्ये जगभरातील देशांतील विविध बँकांचा समावेश आहे. या यादीमध्ये चिनी बँकांचे वर्चस्व कायम आहे.

चिनी बँकांचे वर्चस्व कायम

या यादीत चिनी बँकांचे वर्चस्व कायम असून टॉप 4 क्रमांकावर या बँका आहेत:

  1. Industrial and Commercial Bank of China Ltd.
  2. Agricultural Bank of China Ltd.
  3. China Construction Bank Corp.
  4. Bank of China Ltd.

एकूण 21 चिनी बँका या यादीत असून त्यापैकी 7 बँका टॉप 20 मध्ये आहेत. हे चिनी बँकिंग क्षेत्राच्या जागतिक ताकदीचे उदाहरण आहे.

युरोपियन बँकांच्या पुनर्रचनेमुळे स्थानांतरे

  • 2025 च्या अहवालात विलिनीकरण आणि पुनर्रचना (M&A) यांचा स्पष्ट प्रभाव दिसून आला, विशेषतः युरोपमध्ये.
  • Societe Generale SA (फ्रान्स) तीन स्थानांनी खाली येऊन 22व्या स्थानी पोहोचली, कारण USD 27.36 अब्ज मूल्याची मालमत्ता विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
  • HSBC Holdings PLC, अजूनही युरोपमधील सर्वात मोठी बँक असून जगातील 7वी सर्वात मोठी बँक, तिच्या पुनर्रचना प्रक्रियेमुळे USD 27.23 अब्ज मालमत्तेचा घट झाली आहे.

2025 रँकिंगमधील महत्त्वाचे टप्पे:

  • 38 बँकांनी स्थान उंचावले, 37 बँका खाली गेल्या, तर 25 बँकांचे स्थान कायम राहिले.
  • 4 नवीन बँका 2025 मध्ये यादीत नव्याने दाखल झाल्या.
  • National Bank of Canada (92वा) आणि State Street Corp. (93वा) या नवीन एन्ट्रीज आहेत.
  • अहवालानुसार, युरोपमधील बँका आता मोठ्या प्रमाणात विलिनीकरण आणि पुनर्रचना करत असून, अपयशी युनिट्स विकून आणि प्रभावी कार्यपद्धती स्वीकारून व्यवसायातील कार्यक्षमता वाढवत आहेत.

दरम्यान, SBI आणि HDFC बँकेचा जागतिक रँकिंगमध्ये सातत्याने वाढ हे भारतीय बँकिंग क्षेत्राच्या वाढीव विकासाचे लक्षण आहे. जागतिक बँकिंग प्रणाली विलिनीकरण आणि पुनर्रचनेच्या प्रक्रियेतून जात असताना, भारतीय बँका देखील आघाडीवर आहेत हे यातून स्पष्ट होते.