
गणेशभक्तांसाठी संकष्टीचा दिवस खास असतो. प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा चतुर्थी तिथी येते यापैकी कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) असते. दर महिन्यात संकष्टी चतुर्थीला भाविक गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात. दिवसभर व्रत देखील ठेवलं जातं. धार्मिक मान्यातांनुसार, संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळल्यास, बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. दु:खाचा नाश होतो आणि आपल्यावर कायम बाप्पाची कृपा राहते. पण या संकष्टी चतुर्थीच्या व्रताची खास बाब म्हणजे हे व्रत चंद्र दर्शनानंतर संपतं. त्यामुळे आज महाराष्ट्रात विविध भागात राहणार्या भाविकांना चंद्रदर्शनानंतर आपला उपवास सोडण्यासाठी या चंद्र दर्शनाच्या वेळा ठाऊक असणं आवश्यक आहे.
भाविक चंद्र दर्शनानंतर बाप्पाची आरती करतात. त्याला नैवेद्य दाखवून मगच उपवासाची सांगता करतात. संकष्टीच्या निमित्ताने बाप्पाला दुर्वा, जास्वंद अर्पण केली जातात. खास उकडीचे मोदक दिले जातात.
संकष्टी चतुर्थी चंद्रदर्शन वेळ
मुंबई - 21.51
पुणे - 21.46
रत्नागिरी - 21.45
नाशिक - 21.50
नागपूर - 21.30
गोवा- 21.39
बेळगाव - 21.38
हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विकट संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल. या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते. याशिवाय, या व्रतामुळे सर्व भक्तांना गंभीर समस्यांपासून मुक्तता मिळते अशी भाविकांची धारणा आहे.