Tsunami | Edited Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

जपानची प्रसिद्ध भाकीतकर्ती रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) यांनी आपल्या अचूक भविष्यवाण्यांसाठी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना 'बाबा वंगा ऑफ जपान' (Baba Vanga of Japan) म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी July 2025 मध्ये येणाऱ्या एका प्रचंड सुनामीचा (Mega-Tsunami) इशारा दिला आहे, ज्याचे दर्शन त्यांना एका अतिशय जिवंत स्वप्नात झाले, असे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या याआधीच्या अनेक भाकितांमध्ये अचूकता पाहता, जगभरातून त्यांच्या नव्या इशाऱ्याकडे एकाच वेळी आशंका व भीतीने पाहिले जात आहे.

स्वप्नांचे नियमीत दस्तऐवजीकरण

रियो तात्सुकी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मंगा कलाकार म्हणून केली. मात्र त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे त्यांनी 1980 च्या दशकापासून पाहिलेली भविष्यसूचक स्वप्नं नियमितपणे दस्तऐवजीकरण करणे. त्यांच्या काही स्वप्नांतील घटनेनंतर प्रत्यक्षात घडलेल्या घटना पाहता अनेकांनी त्यांच्या भाकितांकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. सहाजिकच लोकांनी त्यांना बाबा वंगा ऑफ जपान असेच म्हणायला सुरुवात केली आहे.

स्वप्नांतील भाकितांची चित्रमालिका

तात्सुकी यांनी1999 मध्ये ‘The Future I Saw’ या मंगा मालिकेतून आपल्या स्वप्नांतील भाकितांची चित्रमालिका सादर केली. ही मंगा अलीकडे पुन्हा लोकप्रिय झाली आहे, कारण अनेकांनी तिच्या जुन्या दृश्यांची सध्याच्या घडामोडींशी तुलना केली आहे. अनेक सिद्धांतवादी आणि उत्सुक वाचक याला इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सामायिक (शेअर) करत आहेत. (हेही वाचा, Baba Vanga's 2025 Predictions: भूकंप, युरोपमधील युद्ध आणि मानवतेच्या पतनाची सुरुवात? बाबा वांगाची भविष्यवाणी ठरतेय खरी?)

रियो तात्सुकी यांचे महाभयानक सुनामीचे नवे भाकित

  • तात्सुकी यांनी त्यांच्या काही अचूक भविष्यवाण्यांमध्ये Freddie Mercury यांचा 1991 मधील मृत्यू, 1995 चा Kobe earthquake, आणि 2011 चा जपानमधील भूकंप व सुनामी यांचा समावेश आहे. या सर्व घटना त्यांनी याआधीच नोंदवलेल्या होत्या, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो.
  • अलीकडील स्वप्नामध्ये त्यांनी जपानच्या दक्षिणेकडे समुद्र “प्रचंड उकळत आहे” असे चित्र पाहिले, जे एका प्रचंड जलजालातून उद्भवणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे प्रतीक मानले जात आहे. हा उद्रेक जर खरा ठरला, तर संपूर्ण पॅसिफिक किनारपट्टीवर विध्वंस माजवू शकतो, असा इशारा तात्सुकी यांनी दिला आहे.
  • या स्वप्नामध्ये त्यांनी सुनामीचा केंद्रबिंदू हिरकाकृती क्षेत्रात असल्याचे पाहिले, ज्यामध्ये Japan, Taiwan, Indonesia, आणि Northern Mariana Islands चा समावेश आहे. यावेळी तिला ‘ड्रॅगन’सारख्या आकृती या दिशेने येताना दिसल्या, ज्याला काही जण नकाशांवरील भूकंपीय प्रतिकृत्यांशी जोडत आहेत, विशेषतः Hawaii आणि इतर धोकादायक किनारपट्टी भागांशी.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वप्नांतील चेतावणी

वैज्ञानिक समुदाय या भाकितांची पुष्टी करत नसला तरी ते मान्य करतात की जपान हा पृथ्वीवरील सर्वात भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. Pacific Ring of Fire मध्ये स्थित असलेल्या या देशाच्या दक्षिण किनाऱ्यालगत Nankai Trough ही संभाव्य महाभयंकर भूकंप आणि सुनामी उद्भवू शकणारी जागा मानली जाते.

तात्सुकी यांच्या भाकितामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही, मात्र त्यांनी वर्णन केलेला भौगोलिक परिसर संभाव्य धोक्याच्या क्षेत्रात मोडतो, हे मात्र खरे आहे.

स्वप्न, विज्ञान आणि इतिहास यांचा संगम?

रियो तात्सुकी यांचे July 2025 मधील भाकित केवळ योगायोग आहे की अंतःप्रेरणेचे प्रतीक, हे स्पष्ट नसले तरी त्यांच्या इतिहासामुळे अनेकजण त्यांच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. विज्ञान हे नेहमीच आकडेवारी आणि पुराव्यांवर आधारित निर्णय घेण्यास सांगते. मात्र इतिहासाने सिद्ध केले आहे की, अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपण मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाऊ शकतो.