'बाल्कनमधील नोस्ट्राडेमस' (Nostradamus of the Balkans) म्हणून ओळखले जाणारे दिवंगत बल्गेरियन गूढवादी बाबा वांगा (Baba Vanga), त्यांच्या भूतकाळातील भाकितेमुळे अजूनही उत्सुकतेचा विषय आहेत. वाढत्या जागतिक अनिश्चिततेमध्ये 2025 साठीचे त्यांचे भाकिते पुन्हा समोर आले आहे. त्यांनी भूतकाळात केलेल्या अनेक भविष्यवाणीचा संबंध अलिकडच्या अनेक भूकंपीय घटना (Earthquakes) आणि भू-राजकीय तणावांशी जोडला जात आहे. खास करुन म्यानमारमध्ये आलेला भूकंप आणि युरोपमधील युद्धासह (War in Europe) जागतिक आर्थिक संकटांच्या (Global Economic Crisis) पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे.
बाबा वांगाची भविष्यवाणी: 2025
आपल्या मृत्यूपूर्वी (1996) बाबा वांगाने अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. ज्यामध्ये 9/11 चा दहशतवादी हल्ला, राजकुमारी डायनाचा दुःखद मृत्यू आणि जागतिक महासत्ता म्हणून चीनचा उदय यासारख्या प्रमुख जागतिक घटनांचा समावेश आहे. सन 2025 या वर्षासाठी वांगाने केलेल्या अनेक भाकीतांमध्ये विनाशकारी भूकंप, युरोपीय संघर्ष आणि जागतिक आर्थिक पतनाची पूर्वकल्पना दिली होती. या भाकीताचा संबंध जोडायचा तर, अलिकडेच झालेला म्यानकमार भूकंप. ज्यामध्ये 17,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, Baba Vanga's 2025 Predictions For Zodiacs: यंदा 'या' पाच राशींचे भाग्य बदलणार; बाबा वंगा यांनी केली भविष्यवाणी, जाणून घ्या सविस्तर)
सन 2025 साठी भविष्यवाणी
बल्गेरियन गूढवादी केवळ 2025 नव्हे तर त्याहूनही पुढच्या अनेक वर्षांबाबत अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. 'द न्यू यॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार या भविष्यवाणीमध्ये खाली बाबींचा समावेश आहे.
- युरोपमध्ये एक विनाशकारी युद्ध, जे खंडाच्या लोकसंख्येवर लक्षणीय परिणाम करू शकते.
- एक गंभीर जागतिक आर्थिक संकट, कदाचित जगभरातील वित्तीय बाजारपेठा आणि अर्थव्यवस्थांवर परिणाम करेल.
- मानवतेच्या पतनाची सुरुवात, ज्यामुळे सभ्यतेत दीर्घकालीन घट होईल.
सन 2025 नंतर काय घडेल? जगाचा नाश होईल?
गूढवादी विद्यमान वर्षानंतर पुढच्या काही वर्षांबाबतही भविष्यवाणीकेली आहे. ज्यामध्ये अनेक अशुभ घटनांची संभाव्यता व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Baba Vanga's Predictions That Came True in 2024: बाबा वंगा यांचे 2024 मध्ये खरी ठरलेली भाकिते कोणती घ्या जाणून, 2025 साठीही केलीत अनेक भाकीत)
- 2028: मानव शुक्र ग्रहाचा संभाव्य ऊर्जा स्रोत म्हणून शोध घेण्यास सुरुवात करतील.
- 2033: ध्रुवीय बर्फ वितळल्याने समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होईल.
- 2076: साम्यवाद जागतिक स्तरावर पसरेल, ज्यामुळे राजकीय भूदृश्ये बदलतील.
- 2130: मानवता परग्रही जीवनाशी संपर्क स्थापित करेल.
- 2170: एका भयानक दुष्काळाचा परिणाम ग्रहाच्या मोठ्या भागांवर होईल.
- 3005: पृथ्वी मंगळाच्या संस्कृतीशी युद्धात सहभागी होईल.
- 3797: राहण्यायोग्य परिस्थितीमुळे मानवांना पृथ्वी सोडण्यास भाग पाडले जाईल.
- 5079: जगाचा अंत होईल.
दरम्यान, अनेकांना बाबा वांगाच्या भविष्यवाणीवर आक्षेप आहे. या कथीत भविष्यवाणीचे टीकाकार आणि संशयवादी असा युक्तिवाद करतात की बाबा वांगाच्या भाकिते विशिष्ट घटनांशी जोडणारे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. असे असले तरी, त्यांच्या भूतकाळातील भविष्यवाण्या अनेकांना मोहित करत आहेत. तिच्या 2025 च्या भविष्यवाण्या खऱ्या ठरतील की नाही याबाबत येणारा काळच ठरवेल, पण सध्या तरी त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.