Baba Vanga (फोटो सौजन्य - Wikimedia commons)

बाबा वंगा (Baba Vanga) या एक एक बल्गेरियन अंधश्रद्धाळू भविष्यवेत्त्या होत्या, ज्यांना त्यांच्या कथित भविष्यवाण्यांसाठी ओळखले जाते. त्यांच्या अनुयायांच्या मते, त्यांनी अनेक जागतिक घटनांचे अचूक भाकीत केले होते. बाबा वंगाच्या 2025 सालासाठीच्या भविष्यवाण्यांमध्ये युरोपमध्ये एक महायुद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे मानवतेसाठी गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच, त्यांनी प्राचीन प्लेगच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे इंग्लंड विशेषतः प्रभावित होईल. बाबा वंगाच्या इतर भविष्यवाण्यांमध्ये प्रयोगशाळेत वाढवलेल्या मानवी अवयवांच्या यशस्वी निर्मितीची आणि परग्रहवासीयांच्या संपर्काची शक्यता समाविष्ट आहे. बाबा वंगा यांनी 2025 साठी काही राशींसाठीदेखील भाकिते केली आहेत. त्यांच्या मते, हे वर्ष मेष, मिथुन, कुंभ, सिंह आणि वृषभ राशींसाठी महत्त्वाच्या संधी आणि यशांनी भरलेले असेल.

मेष-

मेष राशीसाठी, 2025 हे वर्ष बदलाचे वर्ष असण्याची शक्यता आहे. नवीन उंची गाठण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने, यश आणि संपत्तीच्या दीर्घकालीन आकांक्षा पूर्ण होणार आहेत. अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि अतुलनीय यश मिळविण्यासाठी त्यांना शौर्य आणि चिकाटी दाखवावी लागेल. या राशीच्या व्यक्ती आपली ओळख बदलून एका वेगळ्याचे दिशेने वाटचाल करतील.

मिथुन-

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष संधींनी आणि जीवन बदलणाऱ्या बदलांनी भरलेले असेल. जर त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता आणि अनुकूलता वापरली तर ते आव्हानांवर मात करू शकतील आणि आर्थिक सुरक्षितता आणि वैयक्तिक वाढ दोन्ही साध्य करू शकतात. त्यांचे यश ते नेटवर्किंग आणि सामाजिक संबंधांचा किती चांगल्या प्रकारे वापर करतात यावर अवलंबून असेल. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या लोकांना लक्ष वेधण्यासाठी आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

कुंभ-

2025 हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचे ठरेल असा अंदाज आहे. शनीच्या प्रभावामुळे त्यांची कल्पकता वाढते आणि ते महत्त्वाकांक्षी ध्येये साध्य करण्यास अधिक सक्षम असतील.  त्यांच्या सर्जनशील संकल्पना आणि प्रगतीशील दृष्टिकोन उल्लेखनीय शक्यता आणि यशाचा मार्ग मोकळा करतील. या लोकांना 2025 नव्याने सुरुवात करण्याचा सल्ला दिला जात आहे. या लोकांना नवीन  कल्पनाशीलतेने विचार करण्याची प्रेरणा मिळेल आणि नवीन संकल्पना आणि रोमांचक शक्यतांनी निर्माण होतील.

सिंह-

या राशीच्या लोकांसाठी 2025 मध्ये समृद्ध आर्थिक भविष्य अपेक्षित आहे. त्यांच्या चाणाक्ष स्वभावामुळे आणि शहाणपणाच्या निर्णयांमुळे त्यांना यशस्वी गुंतवणूक आणि करिअरमध्ये यश मिळेल असा अंदाज आहे. हे वर्ष वैयक्तिक कल्याण सुधारण्याची आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची संधी प्रदान करते. (हेही वाचा: Nicolas Aujula New Year 2025 Predictions: यंदा होणार World War III? लंडनच्या निकोलस औजुलाने केली 2025 साठी तिसरे महायुद्ध, ब्रिटीश साम्राज्याच्या पतनासह अनेक भाकिते)

वृषभ-

2025 मध्ये या राशीच्या लोकांसाठी यश आणि आर्थिक सुरक्षिततेचे आश्वासन दिसत आहे. या वर्षी वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. गुंतवणूक आणि करिअरच्या प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांना स्थिरता प्रदान करेल. या वर्षी तुम्हाला अनेक बदल अनुभवायला मिळतील. यावर्षी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

बाबा वंगा यांचा 1996 मध्ये मृत्यू झाला मात्र, त्यांचा वारसा अजूनही जिवंत आहे. मात्र हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, बाबा वंगाच्या अनेक भविष्यवाण्या लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत, ज्यामुळे त्यांच्या अचूकतेबद्दल शंका उपस्थित होतात. त्यांच्या काही भविष्यवाण्या चुकीच्या ठरल्या आहेत, जसे की 2010 ते 2016 दरम्यान अणुयुद्ध होईल आणि 44 वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष शेवटचे असतील.