Nicolas Aujula 2025 Predictions: अजूनही संपूर्ण जग नववर्षाच्या उत्सवात मग्न आहे. मात्र अनेकजण हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, नव्या वर्षात नक्की काय घडणार आहे. याआधी बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये पृथ्वीवर विनाश होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आता आज आम्ही तुम्हाला एका अशा 38 वर्षांच्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने आतापर्यंत जे काही भाकीत केले होते ते खरे ठरले आहे. या व्यक्तीचे नाव निकोलस औजुला असून, त्याला 'लिव्हिंग नॉस्ट्राडेमस' म्हणून ओळखले जाते. त्याने 2025 साठी काही धक्कादायक भविष्यवाण्या केल्या आहेत. लंडनस्थित निकोलस याआधी कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी करत व्हायरल झाला होता. त्याने अलीकडेच एका मीडिया हाऊसला सांगितले की, नवीन वर्ष मोठ्या जागतिक संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींकडे निर्देश करते. त्याने भाकीत केले आहे की, 2025 मध्ये तिसरे महायुद्ध होईल, ज्यामध्ये लोक धर्माच्या नावाखाली एकमेकांना मारतील.

राजकीय आघाडीवर, तो म्हणाला की हे वर्ष ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांच्यातील सलोखा आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांच्या पतनाची वाट पाहत आहे. यासह त्याने भाकीत केले आहे की, यंदा प्रयोगशाळेत अवयव तयर केले जातील. तसेच अतिवृष्टीमुळे विनाशकारी पूर येईल आणि लाखो लोक बेघर होतील. याआधी त्याने कोविड महामारी, नोट्रे डेम कॅथेड्रलला आग, रोबोट आर्मीचा विकास, ब्लॅक लाइव्ह्स चळवळ, डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षीय विजय अशी भाकिते केली होती, जी खरी ठरली आहेत. (हेही वाचा: Baba Vanga 2025 Prediction: 'पूर्वेतील युद्ध पश्चिमेचा नाश करेल', बाबा वांगा यांची 2025 वर्षासाठी भविष्यवाणी)

Nicolas Aujula 2025 Predictions:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)