
आज संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) दिवस गणपती बाप्पांच्या भाविकांसाठी खास आहे. दर महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस हा संकष्टी चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन दिवसभर उपवास करणारी देखील काही भाविक मंडळी असतात. या उपवासाची सांगता चंद्रोदयानंतर (Chandrodaya) होते. त्यामुळे आज तुम्ही संकष्टी चतुर्थीला उपवास करत असाल तर पहा नेमका तो सोडण्यासाठी वेळ काय आहे? नक्की वाचा: संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा Facebook Messages, Images द्वारा शेअर करत खास करा आजचा दिवस!
संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयानंतर गणपती बाप्पाची आरती केली जाते त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्राच्या विविध भागात आणि आवडी निवडीनुसार, तळणीचे, उकडीचे असे वेगवेगळे प्रकारचे मोदक बाप्पाला प्रसाद म्हणून दाखवले जातात. आज संध्याकाळी राज्याच्या विविध भागात चंद्रोदयाची वेळ देखील वेगळी असल्याने पहा नेमक्या तुमच्या शहरात आज चंद्र कधी उगवणार?
मुंबई - 21.51
पुणे - 21.46
रत्नागिरी - 21.45
नाशिक - 21.50
नागपूर - 21.30
गोवा- 21.39
बेळगाव - 21.38
हिंदू धर्मीयांच्या मान्यतांनुसार, गणपती बाप्पा ही देवता सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे. त्यामुळे त्याच्यासाठी केले जाणारे व्रत हे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटांपासून भाविकांना मुक्ती मिळावी. सार्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी केले जाते. जेव्हा महिन्यातील हीच संकष्टी चतुर्थी मंगळावारी येते तेव्हा ती संकष्टी अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाते. हा योग दरवर्षी अंदाजे सहा महिन्यातून एकदा, वर्षातून दोनदा असाच येतो.