
गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chhaturthi) हा प्रत्येक महिन्यात येणारा खास असतो. जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी 6 जुलै दिवशी आहे. त्यामुळे तुम्ही बाप्पाचे भक्त असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच खास असणार आहे. अनेकजण संकष्टी चतुर्थी निमित्त नियमित गणपतीच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेतात. एकदिवसाचं व्रत पाळतात. मग तुमच्याही नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्टांचा हा संकष्टी चतुर्थीचा दिवस खास करायचा असल्यास तुम्ही त्यांच्या दिवसाची सुरूवात मराठमोळी शुभेच्छापत्र, Images, WhatsApp Status, Messages, Greetings, Wishes शेअर करत करू शकता. त्याकरिता लेटेस्टलीने तयार केलेली ही ग्रीटींग्स तुम्ही शेअर करू शकता.
दर महिन्यात कृष्ण पक्षातील संकष्टी ही संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी बाप्पाच्या आवडीचे मोदक नैवेद्य म्हणून केले जातात. तसेच बाप्पाला दुर्वा, जास्वंदाचं फूल अर्पण करण्याची पद्धत आहे.अनेक भाविक रात्री चंद्रोदयानंतर बाप्पाची पूजा करून दिवसभराचा उपवास सोडतात. असा हा मंगलमय दिवस तुमच्याही आयुष्यात आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा. नक्की वाचा: Sankashti Chaturthi Special Rangoli: संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचं रूप रांंगोळीतून साकारून दिवसाची करा मंगलमय सुरूवात!
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा





संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पाच्या आराधनेचा दिवस आहे. कला आणि विद्यांचा अधिपती, संकटमोचक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक हमखास गर्दी करतात. संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास करून काही जण बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी, दु:खांचा नाश करून आयुष्यात सुख, समाधान कायम राहो यासाठी प्रार्थना करतात.