Easy Lord Ganesh Rangoli Designs: मंगलमय दिवसाचं स्वागत रांगोळी शिवाय अपूर्ण आहे. नवं वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला मंगल दिवस विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचा आहे. जानेवारी 2021 मध्ये यंदा दुसर्याच दिवशी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. बाप्पाचा आशिर्वाद घेऊन नववर्षाची सुरूवात करणार्या अनेकांसाठी महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. 2 जानेवारी 2021 ची संकष्टी चतुर्थी ही मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी असल्याने या दिवसाचं महत्त्व अधिक आहे. उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी या संकष्टीला अखुरथ संकष्टी चतुर्थी(Akhuratha Sankashti Chaturthi)असं देखील संबोधलं जातं. मग बाप्पाचा भक्तांसाठी खास असलेला हा दिवस अधिक मंगलमय प्रकारे साजरा करण्यासाठी तुम्ही मनमोहक रांगोळी काढण्याचा विचार करणार असाल तर पहा त्याचे काही नमुने. January 2021 Festival Calendar: जानेवारी 2021 महिन्यातील 'हे' दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या सण आणि उपवासाच्या तारखा.
संकष्टी निमित्त आकर्षक आणि सोप्या रांगोळ्या
View this post on Instagram
रांगोळीतील गणपती
View this post on Instagram
ठिंपक्यांच्या रांगोळीतील गणपतीचं रूप
बॉर्डर रांगोळी
संकष्टी चतुर्थी दिवशी अनेक गणेशभक्त बाप्पाची मनोभावे पूजा करून दिवसभराचा उपवास करतात. संध्याकाळी चंद्रोदयानंतर हा उपवास सोडला जातो. 2 जानेवारी दिवशी महाराष्ट्रात चंद्रोदयाची वेळ रात्री 9 वाजून 16 मिनिटांच्या सुमाराची असल्याने त्यानंतर बाप्पाची आरती करून तुम्ही उपवास सोडू शकतात. मनोकामना पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची प्रथा आहे.