January 2021 Festival Calendar: जानेवारी 2021 महिन्यातील 'हे' दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या सण आणि उपवासाच्या तारखा
Festival Representational image(Photo Credits: Twitter)

January 2021 Festival Calendar: 2020 हे वर्ष संपण्यास अगदी काही दिवसांचा काळावधी बाकी आहे. सध्या प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. यावर्षातील जवळपास सर्व सण आता संपले आहेत. त्यामुळे आता नवीन वर्षापासून उपवास आणि सणांची सुरूवात होईल. नवीन वर्ष प्रत्येकासाठी नवा उत्साह घेऊन येत असतं. यावर्षी कोरोनामुळे जवळपास सर्वच सणांवर परिणाम झाला. मात्र, आशा आहे की पुढचे, वर्ष प्रत्येक उत्सवासाठी चांगले असेल. भारत हा विविधतेने परिपूर्ण असलेला देश आहे. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मासह अनेक धर्मांचे लोक राहतात.

त्यामुळे प्रत्येक धर्माचे स्वतःचे वेगवेगळे सण आणि उत्सव असतात. 2021 मधील पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये येणाऱ्या सणांबद्दल बोलायचं झालं तर, या महिन्यात मकर संक्रांती हा महत्वाचा सण आणि प्रदोष व्रत, एकादशी, शिवरात्री, गणेश चतुर्थी असे उपवास येतात. आज, आपण जानेवारी 2021 मध्ये येणाऱ्या उपवास आणि उत्सवांबद्दल जाणून घेऊयात... Shubh Vivah Muhurat 2021: नवीन वर्षात केवळ 'या' तारखेला पार पडणार लग्नसोहळा; जाणून घ्या पुढील वर्षातील लग्नाचे शुभ मुहूर्त)

जानेवारी 2021 उपवास आणि उत्सवांची यादी -

 • 02 जानेवारी: संकष्टी चतुर्थी
 • 09 जानेवारी: सफला एकादशी
 • 10 जानेवारी: प्रदोष व्रत
 • 11 जानेवारी: मासिक शिवरात्री
 • 13 जानेवारी: लोहड़ी
 • 14 जानेवारी: मकर संक्रांती, पोंगल
 • 15 जानेवारी: माघ बिहू
 • 16 जानेवारी: विनायक चतुर्थी
 • 20 जानेवारी: गुरु गोविंदसिंग जयंती
 • 24 जानेवारी: पौष पुत्रदा एकादशी
 • 26 जानेवारी: भौम प्रदोष व्रत
 • 28 जानेवारी: पौष पौर्णिमा
 • 31 जानेवारी: संकष्टी चतुर्थी

अशा प्रकारे 2021 मध्ये जानेवारी महिन्यातील सण आणि उत्सवाची यादी तुम्ही जाणून घेऊ शकता. तसेच या सणासाठी आतापासून खास तयारी करू शकता. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात येणाऱ्या मकर संक्राती सणाचे विशेष महत्त्व असते. या सणाच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करतात. या दिवशी ज्येष्ठ लोक आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना तीळगूळ देतात.