Aamir Khan And Girlfriend Gauri Spratt (फोटो सौजन्य - X/@iamhyy)

Aamir Khan And Girlfriend Gauri Spratt Video: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. आमिर खानने नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त खुलासा केला होता की, तो बेंगळुरूची रहिवासी गौरी स्प्राट (Gauri Spratt) ला डेट करत आहे. आमिर खानच्या या खुलाशाने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आमिर खान त्याच्या नवीन प्रेयसी गौरी स्प्राटसोबत सार्वजनिकरित्या दिसला. आमिर आणि गौरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही हात धरून एकत्र चालताना दिसत आहेत.

मकाऊ आंतरराष्ट्रीय कॉमेडी महोत्सवात आमिर खानची हजेरी -

आमिर खान मकाऊ आंतरराष्ट्रीय कॉमेडी महोत्सवात सहभागी झाला होता, जिथे गौरी देखील त्याच्यासोबत उपस्थित होती. यावेळी, आमिरने काळ्या कुर्ता-पायजमा घातला होता आणि सोनेरी शालने त्याचा लूक पूर्ण केला होता, तर गौरी स्प्राटने फ्लोरल प्रिंट साडी घातली होती. गौरी साडीत खूपच सुंदर दिसत होती. यावेळी गौरी आणि आमिरसोबत अभिनेते शेन टेंग आणि मा ली देखील उपस्थित होते. (हेही वाचा - Aamir Khan Finds Love Again: अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला? बेंगळुरूमधील एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा)

आमिर आणि गौरी यांनी दिली एकत्र पोज -

या कार्यक्रमात आमिर खानने त्याची प्रेयसी गौरीसोबत पोज दिली. गौरी आणि आमिर हातात हात घालून चालत असतानाचा आणि एकत्र पोज देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकऱ्यांनाही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमिर खानने गेल्या महिन्यात त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नात्याची पुष्टी केली होती. त्याने त्याच्या 60 व्या वाढदिवशी त्याच्या नात्याची पुष्टी केली आणि तो गौरी स्प्रेटला डेट करत असल्याचे उघड केले. (हेही वाचा - Santosh Deshmukh Murder Case: आमिर खानने घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट; धीर ठेवण्याचा दिला सल्ला)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, आमिर खान आणि गौरी पहिल्यांदाच मुंबईत एकत्र दिसले. माध्यमांना गौरीची ओळख करून देताना अभिनेत्याने सांगितलं की, 'तुम्हा सर्वांशी तिची ओळख करून देण्याची ही एक चांगली संधी आहे असे मला वाटले. मग आम्हाला लपूनही राहावे लागणार नाही. ती बंगळुरूचा आहे आणि आम्ही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतो. ती मुंबईत होती आणि आम्ही योगायोगाने भेटलो. आम्ही संपर्कात राहिलो आणि आता आम्ही एकत्र आहोत. हे सर्व योगायोगाने स्वतःहून घडले.'