
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडाने सारा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या प्रकरणामध्ये अद्यापही एक आरोपी फरार आहे. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडीयात आल्यानंतर अनेकांना संताप अनावर झाला. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि खटला न्यायालयामध्ये सुरू आहे. अशातच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी बीड मध्ये देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे.त्याने कुटुंबाकडून या प्रकरणी माहिती घेतली. संतोष देशमुखांच्या मुलाला जवळ घेत सार्यांनाच धीर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान पाणी फाऊंडेशन साठी काम करणार्या आमीर खानने नुकतीच पुण्यात देशमुख कुटुंबाची भेट घेतली. पाणी फाऊंडेशनचा फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांची ही भेट झाली. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये आयोजित या कार्यक्रमाला संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगा विराज देशमुख आले होते तेव्हा त्यांनी ही भेट घेतली.
आमिर खान आणि किरण राव यांनी दिला धीर
अभिनेता आमीर खाननं पुण्यात संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. धनंजय देशमुख यांच्याशी आमीर खाननं आस्थेनं चर्चा केली. 🌿 pic.twitter.com/mWyKna35tb
— Ashish Jadhao (@ashish_jadhao) March 24, 2025
संतोष देशमुख खून प्रकरण
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी देण्याला नकार दिल्याने त्यांचे अपहरण करून अत्यंत क्रुरपणे 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. वाल्मिक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणी नैतिकतेच्या कारणास्तव धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.