Amazon | (Photo Credits: Amazon)

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स (E-Commerce) कंपनी Amazon पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भारतीय ध्वजाच्या (National Flag) प्रतिमा असलेल्या पोशाख आणि खाद्यपदार्थांसह काही उत्पादने विकल्याबद्दल भारतीय सोशल मीडिया युजर्स (Social Media Users) कडून टीकेचा सामना करावा लागत आहे. तिरंग्याचा अशा प्रकारे वापर करणे हा देशाच्या ध्वजसंहितेचा अपमान आणि उल्लंघन आहे, असे काहींनी म्हटले आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी Amazoneच्या वेबसाइटवर कपडे, कप, कीचेन आणि चॉकलेट यांसारख्या वस्तूंची फोटो शेअर केले ज्यावर तिरंग्याच्या प्रतिमा किंवा ठसे आहेत आणि या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी केली. या संदर्भात प्रतिक्रिया मागणाऱ्या ईमेल प्रश्नांना Amazonने प्रतिसाद दिला नाही. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सांगितले की, उत्पादनांवर तिरंगा वापरणे हे भारतीय ध्वज संहिता, 2002 च्या विरोधात आहे.

Tweet

सोशल मीडिया युजर्सने असे म्हटले की असा वापर हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, तर इतरांनी सांगितले की विक्री वाढवण्याचा हा स्वस्त मार्ग आहे आणि त्यामुळे भारतीय नागरिकांची देशभक्ती वाढणार नाही. संहितेनुसार, "ध्वज कोणत्याही पोशाख किंवा गणवेशाचा भाग म्हणून वापरला जाऊ नये. ते उशा, रुमाल, नॅपकिन्स किंवा बॉक्सवर छापले जाणार नाही. (हे ही वाचा WhatsApp Telegram Guidelines: यासाठी Whtsapp आणि Telegram वापरू नका, केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर)

Tweet

Amazon ला यापूर्वी नाराजीचा सामना करावा लागला आहे

हे लक्षात घेण्यासारखे आहे की Amazonला अशा नाराजीचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये, Amazonला भारताच्या तीव्र निषेधानंतर कॅनेडियन वेबसाइटवर सूचीबद्ध केलेला भारतीय ध्वज 'डोरमॅट' काढून टाकावा लागला. दुसर्‍या प्रकरणात, व्यापार्‍यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने Amazon विरुद्ध भारतीय स्पर्धा आयोगाकडे (CCI) तक्रार केली आहे. यामध्ये Amazonवर भारतातील आणखी किरकोळ स्टोअर्स घेण्यास मान्यता मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीएआयटीने सांगितले की, मोअर रिटेलच्या बाबतीत, Amazonने फ्यूचर रिटेलसोबतच्या करारादरम्यान जी फसवणूक आणि चुकीची माहिती दिली होती. भारतातील किरकोळ व्यवसाय आणि 'इन्व्हेंटरी-आधारित' ई-कॉमर्सवर फसवणूक करण्याचा Amazonचा हा प्रयत्न असल्याचे CAIT ने म्हटले आहे.