India to buy land for generative AI data centre : ॲमेझॉन इंडिया मॅक्रोटेक डेव्हलपर्सकडून जवळपास 500-600 कोटींना मुंबईजवळील पलावा येथे सुमारे 40-45 एकर जमीन खरेदी करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. जिथे Amazon वेब सर्व्हिसेसच्या जनरेटिव्ह एआय ऍप्लिकेशन्ससाठी डेटा सेंटर उभारण्याची योजना आहे. पुढील काही महिन्यांत हा करार निश्चित होईल, असे सांगण्यात येत आहे. भूसंपादनानंतर रिअल इस्टेट कंपनी ई-कॉमर्स कंपनीसाठी डेटा सेंटर तयार करेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, या जमीन व्यवहाराबद्दल ॲमेझॉन इंडियाकडून कोणतीही वाच्यता करण्यात आली नाही. (हेही वाचा: Supreme Court YouTube Channel Hack: मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक; प्लॅटफॉर्मवर क्रिप्टोकरन्सीचा प्रचार)
जनरेटिव्ह AI कृत्रिम बुद्धिमत्तेला एक पाऊल पुढे नेते. जनरेटिव्ह एआय एका प्रॉम्प्टसह सुरू होते जो मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, डिझाइन, संगीत नोट्स किंवा एआय सिस्टम प्रक्रिया करू शकते अशा कोणत्याही इनपुटच्या स्वरूपात असू शकते. विविध AI अल्गोरिदम नंतर प्रॉम्प्टला प्रतिसाद म्हणून नवीन सामग्री परत करतात.
गेल्या वर्षी, ॲमेझॉनने सांगितले होते की कंपनी भारतात डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क तयार करण्यासाठी $12.7 बिलियनची गुंतवणूक करणार आहे.मे 2023 मध्ये,कंपनीने डेटा सेंटरची स्थापना करण्यासाठी नवी मुंबईतील के रहेजा कॉर्पकडून सुमारे 4.5 लाख चौरस फूट जमीन 15 वर्षांसाठी भाड्याने घेतली. तर 2022 मध्ये, पवईतील लार्सन अँड टुब्रोकडून याच उद्देशासाठी 5.5 एकर जमीन भाड्याने घेतली होती.