Lok Sabha Election 2024: तेलंगणा काँग्रेसचे उमेदवार जीवन रेड्डी यांचा व्हिडिओ व्हायरल; भाजपला मतदान करणार म्हणणाऱ्या महिलेच्या कानशीलात लगावली (Watch Video)
Jeevan Reddy's video goes viral (PC - X/@MumbaichaDon)

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्वच उमेदवार आणि बडे नेते सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), योगी आदित्यनाथ, राहुल गांधी यांच्यासह सर्व बडे नेते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. तेलंगणा राज्यातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने जीवन रेड्डी (Jeevan Reddy) यांना उमेदवारी दिली आहे. जीवन रेड्डी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर जीवन रेड्डीही प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

जीवन रेड्डी यांनी महिलेच्या कानशीलात लगावली -

दरम्यान, जीवन रेड्डी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जीवन रेड्डी एका महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या जीवन रेड्डी यांच्यासमोर एक महिला उभी आहे. लोक बोलत असताना जीवन रेड्डी महिलेला चापट मारतात. ते महिलेला काही बोलत असताना व्हिडिओमध्ये दिसणारे लोक हसायला लागतात. असे सांगण्यात येत आहे की जीवन रेड्डी यांनी महिलेला विचारले की, तिला कोणाला मतदान करायचे आहे, तेव्हा महिलेने सांगितले की तिला फुलाच्या चिन्हासाठी म्हणजेच भाजपला मतदान करायचे आहे. यावर जीवन रेड्डी यांनी महिलेच्या कानशीलात लगावली. (हेही वाचा -Lok Sabha Election 2024: पुरी येथील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी तिकीट परत केलं; निवडणुकीसाठी पक्षाकडून निधी न मिळाल्याने घेतला निर्णय)

पहा व्हिडिओ -

निजामाबाद लोकसभा जागेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. आरमोर विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली. जिथे काँग्रेस नेते त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार करत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या महिलेने काँग्रेसला मतदान केले होते. यानंतर महिलेने काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.

महिलेने सांगितले की, तिला पेन्शनची सुविधा मिळाली नाही. आरमोर विधानसभा जागा निजामाबाद लोकसभा सीट अंतर्गत येणाऱ्या 7 विधानसभा जागांपैकी एक आहे. तथापी, भाजपने धर्मपुरी येथून अरविंद यांना उमेदवारी दिली आहे.