FM Nirmala Sitharaman (Photo Credits: ANI)

देशात गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर (Fuel Price) गगनाला भिडले आहेत. पेट्रोल- डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किंमतीमुळे सामन्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलने अनेक राज्यांत शंभरी पार केली आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. ही दरवाढ मागे घेण्यात यावी, यासाठी विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहे. याचदरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन (Nirmala Sitharaman) यांनी इंधन दरवाढीचे खापर यूपीए सरकारवर (UPA) फोडले आहे. “काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने ऑइल बॉण्ड आणले होते. त्याचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधनाचे दरात घट होणे कठीण आहे.”, असे त्यांनी म्हटले आहे.

युपीए सरकारने 1.44 लाख कोटी रुपयांचे ऑइल बाँड्स जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. पण युपीए अशी सरकारसारखी चलाखी करणार नाही. ऑइल बाँडमुळे सरकारने गेल्या पाच वर्षात 62 हजार कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. यामुळेच इंधनाचे दर आम्ही कमी करण्यास असमर्थ आहोत, असे सीतारामन यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे पडले महागात, चेन्नई येथून 62 वर्षीय व्यक्तीला अटक

एएनआयचे ट्वीट-

देशात गेल्या काही दिवसांपासून नवनवे उच्चांक गाठणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीला अखेर लगाम बसला आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या 29 दिवसात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल-डिझेलची यापूर्वीची धडकी भरवणारी दरवाढ पाहता महिनाभर किंमती स्थिर राहणे, हादेखील एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. दरम्यान, 4 मे पासून इंधनदरवाढीला सुरुवात झाली होती. मात्र, 18 जुलैपासून इंधनाचे स्थिर आहेत.