भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांच्यावर टीका करणे एका 62 वर्षीय व्यक्तीला महागात पडले आहे. नरेंद्र मोदी यांना कोरोनाची परिस्थिती हाताळता आली नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संबंधित व्यक्तीने एका व्हिडिओच्या माध्यमातून केली होती. दरम्यान, उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) काही जणांनी त्याच्या व्हिडिओवर आक्षेप घेत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, आरोपी हा चेन्नईमध्ये (Chennai) वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी चेन्नई येथे जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
महमोहन मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मनमोहन मित्रा हा मूळचा उत्तर प्रेदश येथील आहे. मात्र, तो गेल्या 35 वर्षांपासून आपल्या कुटुंबासह चेन्नईतील माधवराव येथे स्थायिक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महमोहन मिश्रा हा पॅन कार्ड, आधार कार्ड काढून देण्याचे काम करतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. दरम्यान, त्याने युट्यूब आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर अनेकदा टीका केली आहे. तो हिंदीत बोलत असून त्याचे व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील काही जणांनी आक्षेप घेत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला चेन्नईच्या माधवराम येथून शुक्रवारी अटक केली आहे. त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून त्याच्याविरोधात ट्रांझिट वॉरंट काढण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला रेल्वेने उत्तर प्रदेशला नेण्यात आले आहे. हे देखील वाचा- Bihar Triple Murder: खळबळजनक! एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या, जावयावर खुनाचा संशय; पोलीस तपास सुरू
महत्वाचे म्हणजे, आरोपीचे नुकतेच आलेले व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध नाहीत. परंतु, त्याचा सहा महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती आला आहे. ज्यात तो नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहे. देशात कोरोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नरेंद्र मोदी जनतेसाठी पुरेसे काम करण्यास असमर्थ ठरले आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आरोपीने त्या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.