
बिहारच्या (Bihar) सिवान (Siwan) जिल्ह्यातील भीखाबांध गावात एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या (Triple Murder) केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना रविवारी (15 ऑगस्ट) मध्यरात्री घडली आहे. या घटनेची माहिती होताच दरोन्दा पोलिसांनी (Daronda Police) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कौटुंबिक वादातून जावायाने त्याची पत्नी आणि सासू सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहे.
अलसेन साई (वय, 75), नजमा खातून (वय, 70) आणि नसीमा खातून (वय,30) अशी मृतांची नावे आहेत. तर, मुबारक अली याच्यावर या तिघांच्या हत्येचा आरोप आहे. मुबारक आधी सासरवाडीत राहायचा. मात्र, आठ दिवसांपूर्वी तो येथून निघून गेला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा तो सासरवाडीत राहायला आला. त्यावेळी त्याचे सासू-सासऱ्यासोबत भांडण झाल्याची माहिती समोर येत आहे. याच वादातून मुबारकने पत्नीसह सासू-सासऱ्याची हत्या करून तिथून फरार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हे देखील वाचा-Meerut: बायकोचा माहेरहून परतण्यास नकार, संतप्त नवऱ्याकडून पोटच्या दोन अल्पवयीन मुलीची हत्या
दरोन्दा पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित कुमार यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हत्येचा नेमके कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.