ऐतिहासिक अशा घटनेची आठवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेपैकी मीठाचा सत्याग्रह (Satyagraha) हा त्यातील एक मुख्य भाग आहे. त्यामुळे दांडी (Dandi) येथे 110 करोड रुपये खर्च करुन 15 एकर जमिनीवर राष्ट्रीय मीठ सत्याग्रहाच्या स्मारकाची उभारणी करण्याच आली आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या 30 जानेवारी रोजी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर देशातील नागरिकांसाठी हे स्मारक पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
इंग्रजांची जुलमी राजवट उधळून लावण्यासाठी विविध चळवळी केल्या गेल्या. त्यातील ऐतिहासिक घटनांपैकी एक असा 'मीठाचा सत्याग्रह' कायम लोकांच्या आठवणीत राहणारा आहे. त्यावेळी इंग्रजांनी भारतीयांनी मीठाचे उत्पादन आणि विक्री करण्यावर रोख लावली होती. तर इंग्लडमधून आणलेले मीठ भारतीयांना सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे इंग्रजांच्या या जुलुमशाहीला विरोध करण्यासाठी 1930 रोजी मार्च महिन्यात महात्मा गांधी यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरुवात केली. तर इंग्रजांची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी महात्मा गांधीजींनी सागरतीरावरील चिमूटभर मीठ उचललून मीठ सत्याग्रह केला.
मीठ सत्याग्राहाचे स्मारक उभारलेल्या ठिकाणी 14 सॉल्ट मेकिंग पेन, 41 सोलार ट्री सुद्धा उभारण्यात आले आहे. तसेच खासकरुन महात्मा गांधी यांच्या 80 पदयात्रांचे फोटो, 18 फूट उंचीची गांधींचा पुतळा, खाऱ्या पाण्याचे तलाव आणि 24 ठिकाणांचे स्मृतिपथाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.