![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/11/varun-chakravarthy.jpg?width=380&height=214)
India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही. (IND vs ENG 3rd ODI Live Toss Update: इंग्लंडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली, टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी केले अंमत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11)
या मालिकेनंतर भारतीय संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल. पण त्याआधीच जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले आहे. आता वरुण चक्रवर्तीच्या पायात समस्या आहे. वरुणची समस्या किती गंभीर आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही. बुधवारी अहमदाबादमध्ये नाणेफेक झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, वरुणच्या पायाला त्रास आहे. तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता.
पायाच्या दुखापतीमुळे वरुण चक्रवर्ती संघाबाहेर
UPDATE: Varun Chakaravarthy was unavailable for selection for the 3rd ODI due to a sore right calf. #TeamIndia #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 12, 2025
वरुणचा आतापर्यंतचा रेकॉर्ड
वरुण चक्रवर्तीने कटकमध्ये भारतासाठी एकदिवसीय पदार्पण केले. या सामन्यात त्याने एक विकेट घेतली. वरुणने टीम इंडियासाठी 18 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 33 विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे टी-20 सामन्यात 17 धावांत 5 बळी घेणे. वरुण चक्रवर्तीचा देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगला रेकॉर्ड आहे.