India National Cricket Team vs England Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd ODI 2025) आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जाईल. सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. भारताने आधीच 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडला आपला सन्मान वाचवण्याची संधी असेल. तर भारताला इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी असेल. दरम्यान, इंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघात एक बदल झाला आहे, तर भारतीय संघात तीन बदल झाले आहेत.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर), टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद
England have won the toss and elect to bowl first in the 3rd and final ODI of the series.
Live - https://t.co/S88KfhFzri… #INDvENG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/TrVAf1FUAT
— BCCI (@BCCI) February 12, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)