शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

सर्वोच्च न्यायालयाकडून साबरीमाला खटला सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून शबरीमला खटला अजूनही सुरुच आहे. साबरीमाला मंदिरात महिला प्रवेश करू शकतात की नाही यावर अजून निर्णय व्हायचा आहे. याआधी साबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षीय महिलांना  प्रवेश दिला जात होता. परंतु, सर्व महिलांना साबरीमाला मंदिरात प्रवेश देण्यात यावा, असा उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा वाद अधिकच पेटला गेला. तसेच उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर अनेकांनी आक्षेप नोंदवला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहे. 18 नोव्हेंबरला न्या. शरद बोबडे त्यांची जागा घेतील. त्याआधी रंजन गोगोई महत्त्वाचे निर्णय देत आहेत.

एएनआयचे ट्वीट-

सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयानंतरही मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. याआधी अहमदनगरमधील शनिशिंगणापूर मंदिरातही महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यावेळीही मंदिरातील पुजारांकडून महिलांना मंदिरात प्रवेश न देण्यात यावा, अशी मागणी केली जात होती.  एवढेच नव्हे तर,  भारतात अनेक मंदिरात  महिलांना प्रवेश दिला जात नसल्याचे समोर आले आहे.