War | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचा जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यस्थांवर गंभीर परिणाम होऊ पाहात आहेत. भारतही याला अपवाद नाही. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेली समस्येमुळे भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) आगामी काळात गंभीर परिणामांना सामोरे जाणर अशी शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत. रशिया (Russia) युक्रेन (Ukraine) युद्ध (War) जसजसे लांबत चालले आहे तसतसे भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीकडे वाटचाल करत आहे. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने गुरुवारी इशारा दिला आहे की, युद्धामुळे जगभरातील दोन महत्त्वाचे कृषी प्रधान असलेले देश रशिया आणि युक्रेन यांच्या उत्पादनक्षमता आणि पुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये महागाईचे चटके जाणवायला लागतील. देशांचा राष्ट्रीय विकासाचा दर मंदावेल. खाद्यतेलासोबतच पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूही महागेल. भारतात महागाईचा दर वाढला आहे. हा दर देशाची मध्यवर्थी बँक असलेल्या आरबीआयच्या (RBI) निर्धारीत अंदाजापेक्षा वरच्या स्तरावार पोहोचली आहे.

ग्लोबल फोरकास्टिंग एजन्सी ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स (Global Forecasting Agency Oxford Economics) ने आपल्या नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे दीर्घ कालावधीसाठी जागतीक पातळीवर विविध वस्तूंच्या वितरण आणि वाहतुकीची श्रृंखला खंडीत होईल किंवा त्याची गती मंदावेल. कोमोडिटीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात ग्राहक मुल्य निर्देशांक म्हणजेच सीपीआय (CPI) महागाईचा दर 7% नी वाढू शकतो. (हेही वाचा, Russia-Ukraine War: भारतीय न्यायाधीश Dalveer Bhandari यांनी रशियाच्या विरोधात केलं मतदान; ICJ ने दिले युक्रेनमधील युद्ध त्वरित थांबवण्यास आदेश)

आगामी काळात सर्वाधिक चिंता खाद्यतेलाबद्दल व्यक्त केली जात आहे. कारण सूर्यफूल तेलाच्या जागतिक उत्पादनात 33% हिस्सा हा यूक्रेन आणि 26% हिस्सा हा रशियाचा आहे. म्हणजेच दोन्ही देश मिळून जवळपास 60% खाद्यतेल उत्पादन करतात. दोन्ही देशांचा एकूण ग्लोबल एक्सपोर्टमध्ये 78% जबाबदारी निभावतात. अभ्यासक सांगतात की, भारतात जवळपास 17% खाद्यतेल हे यूक्रेनमधून आयात होते. यात युद्धामुळे आणखी तुटवडा जाणवू शकतो. परिणामी तेलाच्या किमती हळूहळू वाढताना दिसत आहेत.