Russia-Ukraine War: भारतीय न्यायाधीश Dalveer Bhandari यांनी रशियाच्या विरोधात केलं मतदान; ICJ ने दिले युक्रेनमधील युद्ध त्वरित थांबवण्यास आदेश
Dalveer Bhandari (PC - Twitter)

Russia-Ukraine War: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे. 13-2 च्या निर्णयानंतर CJI ने हा आदेश जारी केला आहे. मतदानादरम्यान रशियाने युक्रेनमधील लष्करी कारवाया तात्काळ थांबवाव्यात या बाजूने 13 देश होते, तर 2 देशांनी विरोधात मतदान केले. संयुक्त राष्ट्र न्यायालयातील भारतीय न्यायमूर्ती दलवीर भंडारी (Dalveer Bhandari) यांनी रशियाच्या विरोधात बहुमताच्या बाजूने मतदान केले.

संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात 15 न्यायाधीश असतात. ICJ अध्यक्ष जोन ई डोनोघ्यू (यूएसए), न्यायाधीश पीटर टोमका (स्लोव्हाकिया), न्यायाधीश रॉनी अब्राहम (फ्रान्स), न्यायाधीश मोहम्मद बेनौना (मोरोक्को), न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ (सोमालिया), न्यायाधीश ज्युलिया सेबुटिंडे (युगांडा), न्यायमूर्ती दलवीर भंडारी (भारत), न्यायाधीश पॅट्रिक लिप्टन रॉबिन्सन (जमैका), न्यायाधीश नवाफ सलाम (लेबनॉन), न्यायाधीश इवासावा युजी (जपान), न्यायाधीश जॉर्ज नोल्टे (जर्मनी), न्यायाधीश हिलरी चार्ल्सवर्थ (ऑस्ट्रेलिया) आणि न्यायाधीश अॅड-हॉक डौडेट यांनी बहुमताच्या बाजूने मतदान केले. (वाचा - Russia-Ukraine War: रशियाने चीनकडे मागितले हत्यारबंद  Drone, अमेरिकेसह जगभरातील देशांची चिंता वाढली)

या दोन देशांनी रशियाच्या बाजूने केले मतदान -

ज्या दोन न्यायाधीशांनी रशियाच्या बाजूने मतदान केले ते उपराष्ट्रपती किरील गेव्हॉर्जियन (रशिया) आणि न्यायाधीश स्यू हँकिन (चीन) आहेत. 21 दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. रशिया युक्रेनच्या विविध शहरांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनने आयसीजेचा आश्रय घेतला आहे. ICJ ने रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. ICJ मधील भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी रशियाच्या विरोधात मतदान केले आहे.

कोण आहेत दलवीर भंडारी?

न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची जागतिक न्यायालयातील ही दुसरी टर्म आहे. 2012 मध्ये ते पहिल्या टर्मसाठी निवडून आले होते. त्यांना भारताने पुन्हा नामांकन दिले. यूकेचे नामांकित न्यायमूर्ती ग्रीनवुड यांचा पराभव करून त्यांनी ICJ मध्ये आणखी एक टर्म मिळवली आहे.