
रशिया युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अद्यापही सुरुच आहे. हे युद्ध आणखी किती काळ लांबणार कधी थांबणार याबाबत जगभरात अनिश्चिता आहे. आता तर या युद्धाचे थेट परिणामही इतर देशांना जाणवू लागले आहेत. अशात आता रशियाने (Russia) चीनकडे (China) शस्त्राने सुसज्ज असलेली ड्रोन (Drone) मागितली आहेत, असा आरोप अमेरिकेने केला आहे. रशियाच्या या मागणीमुळे अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांना चिंता वाटते असेही यूएसने (US) म्हटले आहे. ब्लूमबर्गच्या वृत्ताचा हवाला देत एनडीटीव्हने याबाबत म्हटले आहे की, रशियाच्या या मागणीबाबत अमेरिकेने युरोपमधील आपल्या इतर सहकारी देशांनाही इशारा दिला आहे.
रशियाने फेब्रुवारी महिन्याच्या अकेरीस चीनकडे शस्त्रास्त्रांनी युक्त ड्रोन मागितली आहेत. दरमयान, रशियाने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीच युक्रेनवर हल्ला केला होता. या प्रकरणाशी संबंधित माहिती ठेवणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, बायडन सरकारने आपल्या अधिकाऱ्यांनाइशारा दिला आहे. या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर म्हटले की, हे अधिकारी रशियाचा सर्वात शक्तीशाली दोस्त चीनला रशियास मतद करण्यापासून थांबविण्याच्या प्रयत्नात आहे. (हेही वाचा: युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्यास अमेरिकेचा नकार, जागतिक युद्ध टाळण्यासाठी निर्णय घेतल्याचे दिले कारण)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भवन व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आणि चीनचे प्रमुख राजकीय धुरीण आणि कम्युनिस्ट पार्टी पॉलिट ब्यूरोचे सदस्य यांग जाएची यांनी यूक्रेनसह अनेक मुद्द्यांवर इटलीची राजधानी रोम (Rome) येथे सहा तासांहून अधिक वेळ चर्चा केली. एका अधिकाऱ्याने म्हटले की, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. मात्र, या अधिकाऱ्याने सैन्य सहाय्यतेबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.