Chandrayaan 3 (Photo Credit - Twitter)

Chandrayaan 3: आजचा दिवस भारत आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चांद्रयान-3 चा ड्रीम प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 2.35 वाजता चंद्रयान 3 (Chandrayaan 3) पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने उड्डाण करण्यात आले. सुमारे 40 ते 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरतील. संपूर्ण जगाचे लक्ष या चंद्र मोहिमेकडे लागले होते. जर भारताचा हा प्रयत्न यशस्वी ठरला तर दक्षिणी ध्रुव वर लॅंडर उतरवणारा पहिला आणि चंद्रावर यान उतरवणारा भारत देश चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत हा प्रयत्न रशिया, अमेरिका, चीन कडून करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी या मोहिमेचे वर्णन गेम चेंजर असे केले आहे.

पहा व्हिडिओ

लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर 14 पृथ्वी दिवसांच्या समतुल्य दिवसात त्यांचे कार्य आणि चाचण्या करतील. विशेष बाब म्हणजे ही वेळ चंद्राच्या एका दिवसाच्या बरोबरीची असेल. चांद्रयान-2 मोहीम 2019 मध्ये पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी ठरला नव्हता. यंदा इस्रोने या अपयशास कारणीभूत घटकांची पुनर्रचना केली आहे आणि चूका दुरुस्त केल्या आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांना यशाची अपेक्षा आहे. (हे देखील वाचा: Chandrayaan 3 Launch: '....तर आजचा दिवस सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल', चंद्रयान 3 लॉन्चवर पंतप्रधानांनी भावना केल्या व्यक्त)

भारताचे मून-मॅन आणि चांद्रयान-1 चे मिशन डायरेक्टर डॉ. मायालास्वामी अन्नादुराई यांनी चांद्रयान-3 हे अतिशय महत्त्वाचे मिशन असल्याचे म्हटले आहे. भारताने चंद्राच्या परिभ्रमण मार्गाबाबत आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली आहे, आता त्याला सॉफ्ट लँडिंगची क्षमता सिद्ध करावी लागेल. आज जेव्हा भारतीयांसोबतच जगाचे लक्ष देखील या मोहिमेकडे लागले होते.