PM Narendra Modi On Chandrayaan 3: इस्रो कडून आज चंद्रावर भारत देश तिसरे मिशन चंद्रयान 3 (Chandrayaan 3) लॉन्च करणार आहे. आज, दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्र मधून प्रक्षेपण होणार आहे. यासाठी दुपारी 1.05 च्या सुमारास अंतिम काऊंट डाऊन सुरू केले जाणार आहे. चंद्रयान 3 मध्ये चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर लॅंडर उतरवला जाणार आहे. जर भारताचा हा प्रयत्न यशस्वी ठरला तर दक्षिणी ध्रुव वर लॅंडर उतरवणारा पहिला आणि चंद्रावर यान उतरवणारा भारत देश चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत हा प्रयत्न रशिया, अमेरिका, चीन कडून करण्यात आला आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, 14 जुलै 2023 हा दिवस भारताच्या अंतराळ क्षेत्राशी संबंधित असेल तर तो सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. चांद्रयान 3 ही आपली तिसरी चंद्र मोहीम आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. हे उल्लेखनीय मिशन आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्ने घेऊन जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)