आज दिल्लीमध्ये एनडीए (NDA) च्या बैठकीत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी हा क्षण भावूक करणारा असल्याचं म्हटलं आहे. यावेळी एनडीए चा विजय हा अभूतपूर्व आहे. मागील सरकार देखील एनडीए चे होते आणि आताचे देखील एनडीए चे आहे मग आमचा पराभव झाला कसा? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. दरम्यान एनडीए म्हणजे सुशासन असणार आहे. यामध्ये सगळ्यांना समान वागणूक असेल असेही ते म्हणाले आहेत.
4जूनच्या निकालानंतर 'EVM जिवंत आहे का?' असा आपण सवाल विचारला म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. इंडिया आघाडी आता कमजोर होत जाईल आणि अपयशाच्या गर्तेत जाईल कॉंग्रेसला 100 पार करणं देखील कठीण झालं असल्याचं म्हटलं आहे. NDA Sarkar: पं.जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसर्यांदा Narendra Modi पंतप्रधानपदी होणार विराजमान; NDA च्या बैठकीत संसदीय दलाच्या नेतेपदी निवडीवर शिक्कामोर्तब .
एनडीए चा नवा अर्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए म्हणजे New India, Developed India, Aspirational India असं म्हटलं आहे. भारतात सध्या एनडीएला २२ राज्यांत सत्ता मिळाली आहे आणि ते लोकांच्या सेवेमध्ये आहेत. आमची ही युती खऱ्या अर्थाने भारताच्या आत्म्याचे प्रतिक आहे. जिथे आदिवासी बहुल समाज जास्त आहे अशा दहा पैकी सात राज्यांमध्ये एनडीएची सत्ता आहे आणि ते लोकांची सेवा करत आहेत. देशाच्या सेवेचं व्रत आपण हाती घेतलं आहे आणि मागील 10 वर्ष हा फक्त ट्रेलर होता अजूनही बरेच काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गरीब, मध्यमवर्गीयांना सक्षम करणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही लोकांचे कल्याण सुनिश्चित करणे, सर्वांना दर्जेदार जीवन देणे सुरू ठेवू असेही एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान मोदी 9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मोदी हे दुसरे नेते आहेत जे पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत.