पंतप्रधान नरेंद्र मोदी | (Photo Courtesy: Kamal Kishore/PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची वेबसाईट www.narendramodi.in ही धोक्यात असल्याचे एका हॅकरने सांगितले आहे. या वेबसाईटमध्ये काही त्रुटी असल्याचे ट्वीट करत नरेंद्र मोदी यांना तुमची वेबसाईट सुरक्षित करण्यासाठी माझ्याशी संपर्क करावा लागेल असे ट्वीटरवरुन म्हटले आहे.

फ्रान्स (France) येथे राहणारा एथिकल हॅकर एलियट एंडरसन (Elliot Alderson) असे या तरुणाचे नाव आहे. एलिटने या ट्वीटमध्ये एक स्क्रिनशॉट पोस्ट केला आहे. त्यात @narendramodi असे वापरुन मोदींना याबबात सांगितले आहे. तसेच एका अज्ञात सूत्राने तुमच्या वेबसाईटवर माझ्या नावाने एक फाईल अपलोड केली असून त्याच्याजवळ तुमचा संपूर्ण डेटाबेस असल्याचा खुलासा केला आहे.(हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडसाठी हजारो झाडांची कत्तल, ओडिशा दौरा वादात अडकणार?)

मोदी यांची वेबसाईट हॅक झाल्यास त्याचा देशाच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच http://narendramodi.in टीमने एलियटशी संपर्क साधून त्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. तर काम सुरु केल्यामुळे फक्त सबडोमेनवर परिणाम झाल्याचे एलिटने स्पष्ट केले आहे.