पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडसाठी हजारो झाडांची कत्तल, ओडिशा दौरा वादात अडकणार?
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्वीटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ओडिशा (Odisa) दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त हेलिपॅड बनविण्यासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच तात्पुत्या हेलिपॅडसाठी हजारोच्या संख्येने झाडांची कत्तल करण्यात आल्याने वनप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ओडिशा येथील बालंगीर (Bolangir) येथे आज नरेंद्र मोदी यांचा दौरा असणार आहे. तसेच मोदी यांच्या हस्ते रेल्वेमार्गाचे ही उद्घाटन करण्यात येणार आहे. परंतु मोदी यांच्या दौऱ्यासाठी चक्क 1000 ते 1200 झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे. तर स्थानिक मीडियाकडून चार ते सात फूट उंचीच्या 3000 झाडांची कत्तल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ज्या जमिनीवर रेल्वेमार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे ती 2.25 हेक्टर जागा रेल्वे प्रशासनाच्या मालकीची आहे. त्यामधील 1.25 हेक्टर जमिनीवर वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत झाडे लावण्यात आलेली होती. परंतु मोदी यांचे हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी उतरविण्यासाठी जागा नसल्याने झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. मात्र झाडांची कत्तल करण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. पण हजारोंच्या संख्येने झाडांची कत्तल करण्यापूर्वी परवानगी घेतली गेली नसल्याचे उघडकीस आले आहे. तर रेल्वे आणि बांधकाम विभागाने या बाबत आम्हाला काही माहिती नसल्याचे दाखवत हात झटकले आहेत.ने