1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जाहीर करणार अर्थसंकल्प
Union Finance Minister Nirmala Sitharaman | (Photo Credit: Twitter/FinMinIndia)

केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार आहे. संसदेचे कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत जोरदार तयारी सुरुवात करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र सरकारपुढे देशाची अर्थव्यवस्था सुरळीत कशी करावी हे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ब्रीफकेसची परंपरा बदलली आहे. तर आज अर्थसंकल्पाची कॉपी ही लाल सुटकेट ऐवजी लाल कपड्यात ठेवण्यात आल्याचे दिसून आले.

निर्मला सीतारमण यांच्या हातात लाल रंगाचा कपडा असून त्यावर अशोक चिन्ह होते. पण अर्थसंकल्प हा नेहमीच सुटकेस मध्ये घेऊन येण्याची परंपरा आहे. मात्र सीतारमण यांनी ही परंपरा मोडीत काढली आहे. असे प्रथमच झाले आहे की, ब्रीफकेस ऐवजी अर्थसंकल्प लाल रंगाच्या कपड्यातून संसदेत आणण्यात आले होते.(7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शनधारकांना होणार फायदा)

मोदी सरकार यांचे सरकार येण्यापूर्वी तत्कालीन अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी 92 वर्षांची जुनी प्रथा मोडली होती. वर्ष 2017 मध्ये रेल्वेच्या अर्थसंकल्पाची घोषणा सुद्धा अर्थमंत्र्यांनी केली होती. यापूर्वी रेल्वे मंत्री अर्थसंकल्प एक दिवस अगोदर संसदेत ते संसदेत सादर करत होते. अर्थसंकल्प आणि रेल्वेचे अर्थसंकल्प एकत्रित जाहीर करण्याची तारीख सुद्धा बदलली. त्यामुळे आता सुद्धा निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थसंकल्प जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.