पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबत पेन्शनधारकांना नव्या वर्षात मोठं गिफ्ट देणार आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत पेन्शनधारकांच्या पगारात सुद्धा वाढ होणार आहे. मोदी सरकारच्या या घोषणनेंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसह गुजरात मधील विजय रुपाणी यांचे सरकार सुद्धा महागाई भत्ता वाढवून देण्याची शक्यता आहे. त्यानुसार 5 टक्क्यांनी त्यामध्ये वाढ केली जाणार आहे. जर गुजरातच्या सरकारने असे केल्यास तर राज्यातील कर्मचाऱ्यांना ही केंद्रीय कर्मचाऱ्यांऐवढा महागाई भत्ता दिला जाईल.
गुजरात येथे सध्या राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आतापर्यंत 12 टक्के एवढा महागाई भत्ता दिला जातो. मात्र आता जर गुजरात सरकार महागाई भत्ता आणि डीआर मध्ये 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार महागाई भत्ता 17 टक्क्यांवर पोहचला जाईल. सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. याचा फायदा 5.11 लाख कर्मचारी आणि 4.5 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. मात्र जर महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ केल्यास सरकारच्या खात्यात 1821 करोड रुपयांचा अतिरिक्त बोझा उचलावा लागणार आहे. सरकारचा हा निर्णय 1 जुलै 2020 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या संबंधित अधिक माहिती नागरिकांना गुजरात सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाणार आहे.(7th Pay Commission: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकार देणार केंद्रीय कर्मचार्यांना पगारवाढीची गूडन्यूज; 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता)
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी पगारवाढीची खूषखबर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचार्यांसाठी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी यासाठी मागणी करत आहेत. सरकारने मागणी मान्य केल्यास 8000 रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. किमान वेतन वाढवण्यासोबतच आता सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.