7th Pay Commission: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकार देणार केंद्रीय कर्मचार्‍यांना पगारवाढीची गूडन्यूज; 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता
7th Pay Commission (File Image)

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी पगारवाढीची खूषखबर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचार्‍यांसाठी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी यासाठी मागणी करत आहेत. सरकारने मागणी मान्य केल्यास 8000 रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. किमान वेतन वाढवण्यासोबतच आता सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. कॅबिनेटने याला मंजुरी दिल्यास आता बजेटच्या ड्राफ्टमध्ये त्याचा समावेश करण्याची गरज नाही.

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी सध्या फीटमेंट फॅक्टर 2.57 इतका आहे तर तो वाढवून आता 3.68 करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय कर्मचार्‍यांनी केली आहे. दरम्यान नव्या वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांवर पगारवाढीचं गिफ्ट मोदी सरकार देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.  7th Pay Commission: सातवे वेतन आयोगाच्या अंतर्गत ग्रॅज्युटी नियमात बदल; लाखो कर्मचाऱ्यांना मिळतोय अधिक फायदा.

फीटमेंट फॅक्टर आणि किमान वेतनाप्रमाणेच केंद्रीय कर्मचारी सध्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याच्यादेखील प्रतिक्षेत आहेत. सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात वाढ केली जाते. यंदा जानेवारी 2020 मध्ये 5% महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.