Telangana Election 2018: Election जिंकण्यासाठी केला जातोय घुबडाचा वापर
घुबडाचा बळी ( फोटो सौजन्य -Pixabay)

Telangana Election 2018: विधानसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी घुबडाचा वापर केला जात असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर घुबडांची तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच नेत्यांनी विरोधक पक्षाला पराभूत करण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे सत्य समोर आले आहे.

तेलंगणामध्ये सध्या निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. परंतु सेदाममध्ये काही तस्करांना पकडून त्यांच्या कडून घुबड(Owl) जप्त करण्यात आले आहेत. या घुबडांची तस्करी काळी जादू करण्यासाठी येणार असल्याची माहिती उघडकीस आली आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी तेलंगणामध्ये निवडणूक होणार आहे. तर प्रत्येक पक्ष ही निवडणूक(Election) जिंकण्यासाठी एकमेकांवर आरोप केले जात आहेत. मात्र प्रचाराव्यतिरिक्त असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.कर्नाटक मध्ये घुबडांची तस्करी करणारे खूप मोठे जाळे पसरले आहे. या घुबडांची विक्री लाखोंपर्यंत केली जाते. (हेही वाचा -Telangana Election 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी चहावाल्यासारखे वागू नका: अकबरूद्दीन ओवेसी)

तर तस्करी करणाऱ्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले घुबड हे तीन ते चार लाख रुपयांचे असल्याची माहिती समोर आली आहे. घुबडाला इंग्लंड येथे बुद्धीमतेचे प्रतीक मानले जाते. मात्र भारतात काळ्या जादूसाठी घुबडांचा उपयोग केला जात असून त्याच्या माध्यमातून व्यक्तीला वश करता येते अशी अंधश्रद्धा समाजात आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी घुबडाचा वापर करण्यात येणार असल्याची घटना राजकीय पक्षाच चांगलीच रंगली आहे.