Telangana Election 2018: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आपण चाहावाला (Chai Wala)होता. आता पंतप्रधान आहात. तेव्हा पंतप्रधानासारखे वागा. चहावाल्यासारखे नको, असा शब्दांत एमआयएमचे (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्टीत चाहाच आणतात. कधी कडक चाहा, कधी नरम चाहा, कधी चहाची किटली, कधी चाहाचा चुल्हा कोणताही निर्णय घेतला की चाहाचा विषय. हे पंतप्रधान आहेत की आणखी कोण? असा सवालही ओवेसी यांनी या वेळी विचारला. ते हैदराबाद येथे एका रॅलीमध्ये बोलत होते.
तेलंगानामध्ये निवडणूक प्रचारासाठी गेलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे नेते असदूद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ओवैसी आणि आदित्यनाथ यांच्यात जोरदार सामना रंगला आहे. यात वादात आता अकबरुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, 2019 मध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान लग्नांवर बंदी; योगी सरकारचा आदेश)
#WATCH Akbaruddin Owaisi, AIMIM in Hyderabad: Baat karein ki ‘chai chai chai, chai. Har waqt vahi, demonetisation. Ye chai, vo chai, kadak chai, naram chai. Ye Wazir-e-Azam hain ya kya hain? Arey chaiwala tha, ab Wazir-e-Azam hai. Wazir-e-Azam jaisa ban jao. (02.12.2018) pic.twitter.com/t4xA1S103j
— ANI (@ANI) December 3, 2018
दरम्यान, एका सभेला संबोधीत करताना आदित्यनाथ यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली होती. जर भाजप सत्तेत आला तर ओवैसींना तेलंगानातून पळून जावे लागेल जसे हैदराबादमधून निजाम पळाले होते. तेलंगाना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आयोजित केलेल्या सभेत आदित्यनाथ यांनी हिंदू कार्ड खेळले. त्याला ओवेसी बंधूनी प्रत्युत्त दिले.