World Bicycle Day 2021: 'इंडिया सायकल्स4चेंज’ आव्हानाला देशात गती;  41 शहरे सायकलिंग स्नेही उपक्रमांत
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

इंडिया सायकल्स 4 चेंज आव्हानाला देशातील शहरांमध्ये गती मिळायला सुरुवात झाली आहे. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत गेल्या वर्षी 25 जून 2020 रोजी कोविड -19 महामारीला प्रतिसाद म्हणून हे आव्हान सुरू केले होते. गेल्या वर्षभरात, सायकलिंग क्रांतीने वेग घेतला असून ते पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आहे तसेच ते सुरक्षित आणि तंदुरुस्त ठेवणारे वैयक्तिक वाहतुकीचे साधन आहे जे सामाजिक अंतर देखील सुनिश्चित करते. कोविड -19 देशभरात सर्वत्र शिरकाव करत असल्यामुळे सायकलसाठी मागणीत वाढ होत गेली. लॉकडाउन निर्बंधामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

त्यांनी कमी आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी वैयक्तिक आणि कोविड-सुरक्षित पर्याय म्हणून सायकलिंगकडे पाहिले. शिवाय, सायकल चालवणे हे देखील घरात बंदिस्त राहिलेल्या लोकांसाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचे एक साधन म्हणून पाहिले गेले -

या पार्श्वभूमीवर, इंडिया सायकल 4 चेंज आव्हानाच्या प्रारंभामुळे, 107 शहरांनी सायकलिंग क्रांतीचा भाग म्हणून नोंदणी केली आणि 41 शहरांनी सायकल स्नेही शहर बनवण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण, चर्चा, पॉप-अप सायकल लेन, सुरक्षित आसपासचा परिसर, मोकळ्या रस्त्यांवरचे कार्यक्रम, सायकल रॅली किंवा ऑनलाइन अभियान यासाठी पुढाकार घेतला. मोहिमेचा भाग म्हणून शहरांनी 400 किमी मुख्य मार्ग आणि जवळपास 3500 कि.मी. हून अधिक आसपासच्या रस्त्यांवर काम सुरु केले. इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) च्या सहकार्याने स्मार्ट सिटीज मिशनने 107 शहरांना विविध सायकलिंग उपक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण मॉड्यूल आणि इतर क्षमता निर्मिती उपक्रमांचे आयोजन केले.

खालील उपक्रम हाती घेण्यात आले-

  • पिंपरी चिंचवड, कोहिमा, ग्रेट वारंगल, नागपूर, पणजी आणि इतर अनेक शहरांमध्ये रॅली आणि सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले ज्यात हजारो सायकलस्वार रस्त्यावर उतरले.
  • नाशिक, न्यू टाउन कोलकाता आणि बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये वृद्ध महिलांसाठी सायकल प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि त्यांचा सायकल चालवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यात आला. शहरांची यादी आणि फोटोसाठी येथे क्लिक करा.

3 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाकडून World Bicycle Day म्हणून घोषित करण्यात आला आहे. United Nations General Assembly ला जेव्हा या सायकल हा वाहतूकीचा एक उत्तम, परवडणारा पर्याय असल्याचं समोर आल्यानंतर त्यांनी समाजात त्याचा वापर वाढवण्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.