डिजिटल रेप (Digital Rape) हा शब्द ऐकल्यावर अनेकांना इंटरनेटवरुन केले जाणारे लैंगिक शोषण अथवा अत्याचार असे वाटण्याची शक्यता आहे. पण, वास्तविकत: ते तसे नाही. या प्रकारच्या अत्याचारात पीडिताचे शोषण हे इंटरनेटवरुन केले जात नाही. ही संकल्पना 'डिजिट' आणि 'रेप' अशा दोन शब्दांपासून बनली आहे. इंग्रजीमध्ये 'डिजिट' शब्दाचा अर्थ हा अंक असा होतो. तर रेपचा अर्थ बलात्कार. त्यावरुनच "डिजिटल रेप' (What is Digital Rape Know in Marathi) ही संकल्पना पुढे आली. सहाजिकच आता प्रश्न निर्माण होतो, अंक आणि बलात्कार यांचा काय संबंध? आणि जरी असलाच तरी अंकांच्या सहाय्याने गुन्हेगार गुन्हा कसा करणार? त्याचे पीडितावर काय परिणाम होणार? म्हणूनच जाणून घेऊ हे प्रकरण आहे तरी काय?
डिजिटल रेप म्हणजे नेमके काय? तो कसा होतो?
जेव्हा लैंगिक अत्याचार होतो तेव्हा जिडिट म्हणजे तुमच्या हाताचे बोट अथवा अंगठा यांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या बलात्कारांना 'डिजिटल रेप' म्हटले जाते. डिजिटल रेपशी संबंधित अत्याचारामध्ये पीडिताच्या (पुरुष किंवा स्त्री) यांच्या गुप्तांगात हाताची बोटे किंवा अंगटा यांचा प्रवेश केला जातो. अशा वेळी लैकिकार्थाने कायद्यात वापरलेला इंद्रिय प्रेवश अथवा अत्याचार म्हणून गणल्या गेलेल्या कक्षेला मर्यादा येतात. अशा प्रकारचे गुन्हे कमी असले तरी तो बलात्काराच्या वास्तविक गुन्ह्यांइतकाच भयंकर आहे. (हेही वाचा, Metaverse Gang-Rape Case: व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम दरम्यान 16 वर्षीय मुलीवर व्हर्च्युअल गँगरेप)
बलात्कार आणि डिजिटल बलात्कार यात फरक काय?
जेव्हा प्रत्यक्ष बलात्कार होतो तेव्हा पीडित व्यक्तीस शारीरिक, मानसिक वेदना आणि सामाजिक प्रतिमाहननास सामोरे जावे लागते. मात्र, डिजिटल रेप या संकल्पनेत पीडित व्यक्तीस शारीरिक वेदना सहन करावी लागत नाही. मात्र, बलात्कार प्रकरणाती व्यक्ती इतकीच त्याला मानसिक वेदना सहन करावी लागते. सन 2021 पूर्वी डिजिटल रेप हा छेडछाडीच्या गुन्ह्याच्या कक्षेत होता. मात्र, निर्भया प्रकरणानंतर अशा प्रकारचा अत्याचार बलात्कार (डिजिटल) कक्षेत आणला. (हेही वाचा, Digital Rape: अल्पवयीन मुलीसोबत 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी 80 वर्षीय वृद्धाला अटक; डिजिटल बलात्कार म्हणजे काय? जाणून घ्या)
आरोपीस किमान पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद
भारतीय दंड संहिता कलम 354 आणि 376 अन्वये या प्रकरणातील पीडिता जर अल्पवयीन व्यक्ती असेल तर काही प्रकरणांमध्ये आरोपी आणि गुन्हेगारांना पॉक्सो कायदाही लागतो. भारतीय दंड संहितेनुसार, डिजिटल रेप प्रकरणात आरोपीस किमान पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. काही प्रकरणे जर अधिक जटील आणि त्यांची व्याप्ती मोठी असेल तर अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूदही आहे. या गुन्हात इतर कलमांचा अतर्भाव झाला तर गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते.
बलात्कार प्रकरणात कोणत्याही व्यक्तीच्या गुप्तांगात त्याच्या संमतीशिवाय जबरदस्तीने लिंग घालणे म्हणजे बलात्कार अशी कायदेशीर व्याख्या आहे. मात्र, बलात्काराच्या नव्या व्याख्येनुसार कोणतीही महिला, अथवा पुरुषाच्या गुप्तांगात त्याच्या संमतीशिवाय शरीराचा कोणताही भाग अथवा वस्तू घुसवणे हा बलात्कारच आहे असे मनले गेले आहे. व्यक्ती, पीडिता यायंच्या गुप्तांगास वेदना अथवा नुकसान पोहोचवणे याचा अर्थ बलात्कारच मानला जातो. उल्लेखनिय असे की, जबरदस्तीने केलेला ओरल सेक्स हासुद्धा बलाद्काराच्याच कक्षेत येतो.