Metaverse Gang-Rape Case: अल्पवयीन मुलीवर 'व्हर्च्युअल बलात्कार', युकेमधील बहुदा पहिलीच घटना
Digital Rape | (Photo credit: archived, edited, representative image)

ब्रिटनमधील मेटवार्स मध्ये व्हर्च्युअल रियालिटी व्हिडिओ गेम (Girl Gang Raped Online Metaverse) दरम्यान एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर व्हर्च्युअल सामूहिक बलात्कार (Virtual Gang Rape) झाल्याची घटना पुढे आली आहे. त्यामुळे यूके पोलीस प्रथमच आभासी वास्तविकता गेममधील कथीत लैंगिक अत्याचार प्रकरणाच तपास करत आहेत. अशा घटनांमध्ये पीडिताला लैंगिक अत्याचाराचा शारीरिक रुपात सामना करावा लागत नाही. मात्र, त्याला मानसिक त्रास आणि वेदना सहन कराव्या लागतात. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून तपासही सुरु केला आहे. 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या अवतार म्हणजेच तिच्या डिजिटल कॅरेक्टरसोबत अज्ञातांनी सामूहिक बलात्कार केला.

वृत्तामध्ये म्हटले आे की, पीडितेच्या डिजिटल अवतार म्हणजेच कॅरेक्टरशी कथीत रुपात काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना घडत असताना तिने एका इमर्सिव हेममध्ये वर्च्युअली डेडसेट वापरला होता. या घटनेत तिच्या शरीराला कोणतीही जखम अथवा वेदना झाली नाही. मात्र, तिला भावनिकदृष्ट्या प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. तिला धक्का पोहोचला.

पुरुषांच्या एका गटाकडून 'ऑनलाईन बलात्कार'

पीडित तरुणीने सांगितले की, व्हर्च्युअल रिअॅलीटीमध्ये हेडफोन घेतला होता. त्याच वेळी पुरुषांच्या एका गटाने तिच्यावर बलात्कार केला. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की तिला पीडितेला कोणतीही शारीरिक दुखापत झाली नसली तरी,"वास्तविक जगात" बलात्कार झालेल्या व्यक्तीप्रमाणेच भावनिक आणि मानसिक आघात सहन करावा लागला आहे. पोलिसांनी तपास केलेला हा पहिला आभासी लैंगिक गुन्हा असल्याचे मानला जात आहे. (हेही वाचा, Digital Rape Case: सहा वर्षाच्या मुलीसोबत 'डिजिटल रेप', नराधमास अटक)

युके पोलिसांची लढाई डिजिटल गुन्हेगारांशी

इंग्लंडमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसा, पीडित मुलगी आभासी स्वरुपातील वर्च्युअल रियायलिटी गेमच्या एका ऑनलाईन खोलीत गेली होती. ज्यामध्ये इतरही काही लोक उपस्थित होते. या वेळी तिला त्या खोलीतील काहींनी आपल्या वासनेची शिकार बनवले. इंग्लंडच्या नॅशनल पोलीस चीफ काऊन्सीलच्या बाल अधिकार आणि अत्याचार चौकीशी विभागाचे प्रमुख इयान क्रिचले यांनी म्हटले की, मोटावर्सनी मेटावर्स यांनी लैंगिक अत्यचाराची घटना केली आहे. त्यामुळे आमची सामूहिक लाईल अशा प्रकारच्या डिजिटल गुन्हेगारांशी आहे. ज्यामुळे आम्ही विश्वास देऊ शकेल की, आमचे युवक ऑनलाईन स्वरुपात सुरक्षित आहेत. तसेच, ते कोणत्याही तंत्रज्ञानाचा उपयोग निर्भयपणे करु शकतील. (हेही वाचा, Digital Rape: अल्पवयीन मुलीसोबत 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी 80 वर्षीय वृद्धाला अटक; डिजिटल बलात्कार म्हणजे काय? जाणून घ्या)

वाढते डिजिटल गुन्हे तोकडे कायदे

इयान क्रिचले यांनी पुढे म्हटले आहे की, गुन्हेगारांनी थेट व्हर्च्युअल म्हणजेच अभासी जगाततच थेट प्रवेश केला आहे. जटिल डिजिटल अर्थव्यवस्थां, अत्याचार, अश्लिल आणि अभद्र भाषा, धमकी अशा माध्यमांतून हे गुन्हे विस्तारत आहेत. क्रिचले यांनी म्हटले की, नव्याने विस्तारत असलेल्या गुन्हेगारांच्या कक्षा आणि स्वरुप यांच्याशी सामना करण्यासाठी आमच्या तपास यंत्रणाही त्या पद्धतीने विकसित व्हायला हव्यात. जेणेकरुन आम्ही सर्व ऑनलाईन ठिकाणांवरच गुन्हेगारांचा पाटलाग करु आणि पीडितांना संरक्षण देऊ.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी अद्याप कायदेच तयार झाले नसल्यामळे गुन्हांची उकल आणि अंमलबजावणीसाठी अनेक आव्हाने आहेत. त्यातच कथित गुन्ह्याच्या वेळी किशोरवयीन मुलगी कोणता गेम खेळत होती हे अद्याप अस्पष्ट आहे.