Digital Rape: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये 'डिजिटल रेप' (Digital Rape) चे प्रकरण समोर आले आहे. जे ऐकूण सगळेचं हैराण झाले आहेत. तुम्ही आतापर्यंत बलात्काराच्या अनेक घटना ऐकल्या असतील. परंतु, नोएडा (Noida) मध्ये डिजिटल बलात्काराचे प्रकरण समोर येताच लोकांना यासंदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शहरातील सेक्टर-39 परिसरात राहणारा एक वृद्ध चित्रकार आपल्या अल्पवयीन मोलकरणीवर गेल्या सात वर्षांपासून डिजिटल बलात्कार करत होता. पीडित तरुणी गेल्या सात वर्षांपासून वृद्धांच्या अत्याचाराला सामोरे जात होती. डिजिटल रेप'मध्ये आरोपी हात, बोटे, किंवा इतर कोणत्याही वस्तूचा वापर करून पीडितेवर अत्याचार करत असे.
अल्पवयीन मुलीने पोलिसात केली तक्रार -
पीडितेच्या संयमाचा बांध फुटताच तिने पोलिसांत तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वृद्ध चित्रकाराला अटक करून कारागृहात रवानगी केली. अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, आरोपी वृद्ध चित्रकार मूळचा प्रयागराजचा रहिवासी आहे. पेंटर मॉरिस रायडर (80) सेक्टर 46 मध्ये एका महिला मैत्रिणीसोबत राहतात. (हेही वाचा - Crime: प्रेयसी असतानाही थाटत होता दुसरा संसार, तरुणीला कळताच तिने गाठलं पोलिस स्टेशन, पोलिसांनी आरोपीला घातल्या बेड्या)
पीडित मुलगी घरकाम करते. पीडित तरुणीचा आरोप आहे की, आरोपी चित्रकार मॉरिस रायडर गेल्या अनेक वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार पीडितेने केली आहे. ती दहा वर्षांची असल्यापासून आरोपीकडे राहत होती. रणविजय सिंह यांनी पुढे सांगितले की, पीडितेने आरोपी चित्रकाराचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 376,323, 506 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
डिजिटल रेप म्हणजे काय? जाणून घ्या
हा शब्द ऐकून तुम्हाला असे वाटेल की, इंटरनेटच्या माध्यमातून बलात्कार झाला असेल. पण डिजिटल बलात्काराचा मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी काहीही संबंध नाही. डिजिटल बलात्कार म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मुलगी किंवा मुलाचे शोषण होत नाही. 'डिजिटल रेप'मध्ये आरोपी हात, बोटे, किंवा इतर कोणत्याही वस्तूचा वापर करतो.
इंग्रजीमध्ये डिजिटचा अर्त अंक असला तरी, इंग्रजी शब्दकोशानुसार बोट, अंगठा, पायाचे बोट, या शरीराचे अवयव देखील डिजिटने संबोधित केले जातात. डिजिटने केलेल्या लैंगिक छळाला 'डिजिटल रेप' म्हणतात. वास्तविक, डिजिटल बलात्काराच्या घटनांमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बोटांचा वापर केला जातो. निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक छळाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी डिजिटल रेपमध्येही अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.