Representational Image |(Photo credits: PTI)

सध्या शहरांमध्ये वाहतुकीसाठी अनेक अॅप आधारित सेवा वापरल्या जातात. यामध्ये ‘उबर’ (Uber) ही एक लोकप्रिय सेवा म्हणून ओळखली जाते. आता कॅब एग्रीगेटर उबेरने ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी झटकली आहे. आपण फक्त चालक-भागीदार आणि ग्राहक यांना जोडतो व ड्रायव्हर्सची गुणवत्ता, प्रवाशांची सुरक्षितता इत्यादीची हमी देत ​​​​नाही, असे उबरने शहर ग्राहक आयोगासमोर सांगितले आहे. या गोष्टी आपल्या अटी आणि शर्तींच्या डिस्क्लेमरमध्ये नमूद केले असल्याचेही कंपनीने सांगितले.

एका 38 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीवर कंपनीने हा प्रतिसाद दिला आहे. गेल्या वर्षी या महिलेला तिच्या पाळीव कुत्र्यासोबत उबेर कॅबने प्रवास करण्यास नकार दिला होता. उबरने म्हटले आहे की. ‘ड्रायव्हर-पार्टनर' त्यांचे अॅप हे एक 'स्वतंत्र कंत्राटदार' म्हणून वापरतात आणि म्हणून चालकांच्या कृत्यांसाठी किंवा सेवेदरम्यान घडणाऱ्या कोणत्याही घटनांसाठी तेच वैयक्तिकरित्या जबाबदार असतात, कंपनीचा याच्याशी संबंध नाही.

कंपनीने असेही निदर्शनास आणून दिले की, चालक हे त्यांचे कर्मचारी नाहीत किंवा ते त्यांच्या मालकीची वाहने चालवत नाहीत आणि म्हणूनच कंपनी अशा कंत्राटदारांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवत नाही. कंपनीने पुढे म्हटले आहे की, सेवेचा लाभ घेताना ग्राहकाने अटी व शर्ती मान्य केल्या आहेत. यानुसार, त्यात म्हटले आहे, ‘ग्राहक यासाठी सहमत आहेत की सेवेच्या वापरामुळे उद्भवणारी संपूर्ण जोखमीसाठी फक्त तेच जबाबदार आहेत.’

अॅपवर नोंदणी करण्यापूर्वी वापरकर्ते सेवेच्या अटी स्वीकारण्यासाठी 'सहमत' बटणावर होकारार्थी क्लिक करतात. संमतीचा हा प्रकार 'क्लिक रॅप' म्हणून ओळखला जातो आणि तो माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार वैध आहे. अशाप्रकारे तक्रारदार त्याच्या अटी व शर्तींना बांधील आहे. महिलेच्या तक्रारीबाबत कंपनीने सांगितले की, एका ड्रायव्हरने तिला नकार दिल्यावर, तिच्या आणखी एका ड्रायव्हर-पार्टनरने तिचे बुकिंग पूर्ण केले आणि त्यामुळे ती सेवेमध्ये कमतरता असल्याचा आरोप करू शकत नाही. (हेही वाचा: Video: पोलिसांनी अडवले म्हणून चिडलेल्या चालकाने पेट्रोल टाकून गाडीला लावली आग)

महिलेने आपल्या उत्तरात म्हटले, ‘उबर ही केवळ सुविधा देणारी एजन्सी नाही, तर ती ड्रायव्हर्सना कामावर ठेवते, ग्राहकांकडून त्याच्या खात्यात पैसे जमा करते आणि तिच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल चालकांवर कारवाई करण्याची ती एक प्रणाली आहे. कंपनी ग्राहकांप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर जात आहे आणि एकतर्फी अटी आणि पक्षपाती डिस्क्लेमरचे कारण देऊन न्यायालयाची दिशाभूल करत आहे.’