देशात हिवाळ्याच्या महिन्यांत अत्यल्प पाऊस आणि एप्रिलमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये दीर्घकाळापर्यंत उष्णतेच्या लाटा यामुळे देशातील 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी गुरुवारी मागील वर्षाच्या पातळीपेक्षा 19% खाली घसरली. हा सलग 30 वा आठवडा ज्यामध्ये पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. देशातील वातावरणात मोठा बदल झाल्याने नागरिकांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. भारतातील बहुतेत जलाशयांमधील पाणी पातळी घसरलीआहे. दक्षिण भारतामधील 42 जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली आहे. तेथील 42 जलशयांमध्ये फक्त 16 टक्के पाणीसाठा आहे. तर पाच कोरडे पडले आहेत. (हेही वाचा - Marathwada Drought: मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ; 12 लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा)
दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्य येतात. दक्षिणेतील या राज्यात 16 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या मते, पाण्याची पातळी गेल्या 10 वर्षांच्या सरासरीपेक्षा 30% कमी आहे. जलाशये क्षमतेच्या फक्त 28% पर्यंत भरली आहेत. केंद्रीय जल आयोगानुसार, दक्षिणेकडील राज्यांमधील 42 जलाशयांमध्ये सध्या केवळ 16% पाणी साठा आहे. यापैकी 5 कोरडे पडले आहेत.
देशातील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानामुळे अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या भागात साधारणत: 44 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताचा काही भाग वगळता भारताच्या बहुतांश भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला असल्याने धरणांमधील पाण्याची पातळी या महिन्यात आणखी घसरण्याची अपेक्षा आहे.