युपी मधील गाझियाबाद मध्ये फसवणूकीची एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. खरंतर चोरट्यांनी काही महिन्यांपूर्वी बंद असलेल्या मोबाईक क्रमांकाचा वापर करुन एका व्यक्तीच्या खात्यामधून तब्बल 16 लाख रुपये लुटले. तर ज्यांच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली त्या व्यक्तीची बहीण जीएसटी विभागात डेप्युटी कमिश्नर आहेत. या प्रकरणी मधुबन बापूधाम पोलीस आणि सायबर सेलकडून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस चोरट्यांनी ज्या प्रकारे चोरी केली ते ऐकून हैराण झाले आहेत.
या प्रकरणी एसपी सिटी निपुण अग्रवाल यांनी म्हटले की, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे भानु प्रताप शर्मा, त्रिलोक शर्मा, दीपक आणि विपिन राठोर आहे. या आरोपींकडे काही मोबाईल, 20 हून अधिक एटीएमस 5 लाखांची रोकड आणि फसवणूक केल्यानंतर मिळालेल्या पैशांमधून खरेदी केलेली अर्टिका जप्त केली आहे.(Uttar Pradesh Rape: क्रिकेट प्रशिक्षकाकडून विद्यार्थ्याच्या आईवर बलात्कार, उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील घटना)
सीओ सायबर सेल अभय कुमार मिश्रा यांच्या मते, फसवणूकीला बळी पडलेले गौरव गुप्ता मधुबन बापूधाम क्षेत्रातील एका कॉलनीत राहतात. त्यांचे आधार आणि बँक खाते हे बँक खात्याला लिंक झाले नव्हते. कारण मोबाईलमध्ये रिचार्ज नसल्याने बंद झाला होता. पण गौरव यांनी बँक ऑफ बडोदा मध्ये नंबर अपडेट करण्यासाठी अर्ज सुद्धा दिला होता. मात्र तो अपडेट झालाच नाही. मात्र नंतर काही महिन्यांनी तोच क्रमांक दिल्लीत राहणाऱ्या विपिन राठोर याला अलॉट झाला. जेव्हा त्याला बँक संबंधित काही मेसेज येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्याने याची माहिती त्याचा मित्र भानु याला दिली. जो फसवणूकीच्या प्रकरणात आधीपासूनच तरबेज होता.
विपिन राठोर याने बँकेच्या मेसेज बद्दल सांगितले असता भानु याने तो क्रमांक तपासून पाहिला. तेव्हा कळले की, तो क्रमांक गौरव गुप्ता यांच्या आधार कार्ड आणि खात्याला लिंक आहे. त्यानंतर भानु याने विपिनसह मिळून बनावट पेपर तयार करुन चोरी करण्याचा प्लॅन केला. भानु याने आपल्या साथीदाराला 8 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. आता भानु याने दीपक नावाच्या व्यक्तीला गौरव गुप्ता याचे आधार कार्ड डाऊनलोड करण्याचे काम दिले. यासाठी त्याला 1 लाख 30 हजार रुपये देण्याचे ठरले. तर दीपकने युट्यूबवर फक्त मोबाईल क्रमांकाचा माध्यमातून आधार कार्ड कसे तयार करायचे हे शिकले. गौरव गुप्ताचे आधार कार्ड डाऊनलोड करत त्यावर विपिन राठोर याचा फोटा लावण्यात आला. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारावर बँक ऑफ बडोदा येथून गौरव गुप्ताच्या खात्यासाठी एक नवे डेबिट कार्ड घेतले.
त्यानंतर त्रिलोक शर्माने डेबिट कार्डच्या माध्यमातून गौरव गुप्ता यांच्या खात्यामधून नेट बँकिंगच्या मदतीने 16 लाख रुपये ट्रान्सफर केले. ही रक्कम एकमेकांना दिली गेली. या व्यतिरिक्त त्रिलोक शर्माने एका जुनी अर्टिगा सुद्धा खरेदी केली. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे कळताच गौरव गुप्ता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास आणि चौकशी केल्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ऐवढेच नव्हे तर पोलिसांना चौकशीत असे समोर आले की, 16 लाख रुपयांची फसवणूक करणारा मास्टरमाइंड भानु प्रताप शर्मा याने आपल्या भावासह दिल्लीतील अशोक नगर मध्ये गुगलमध्ये जाहीरात देतो असे सांगून घरबसल्या रेस्टॉरंट, ढाबा आणि अन्य फुड स्टॉलचे FSSAI लायसन काढून देण्याच्या नावाखाली लुट करायचा. गेल्या दोन वर्षात लोकांची 1 कोटींहून अधिक रुपयांची लुट या आरोपीने केली आहे.