Uttar Pradesh Rape: क्रिकेट प्रशिक्षकाकडून विद्यार्थ्याच्या आईवर बलात्कार, उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील घटना
Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

देशात महिला अत्याचार आणि बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबाद (Ghaziabad) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. या परिसरातील क्रिकेट प्रशिक्षकांनी (Cricket Coach) एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेचा मुलगा आरोपीकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला मंगळवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास तिच्या मुलाची कागदपत्रे आरोपीकडे जमा करण्यास गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडिताला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने ताबडतोब नवऱ्याला बोलावून घेतले आणि इंदिरापूरम पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा-Bihar Shocking: क्रिकेट सामन्यात 'रन आऊट'वरून पेटला वाद, मैदानातच एकाची हत्या

इंदिरापुरम पोलीस स्टेशनचे एसएचओ संजय पांडे म्हणाले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात आयपीसी कलम 376 , 506 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी पाठवले. मात्र, त्याच्या दरवाज्याला कुलूप होते. दरम्यान, आरोपी गेल्या दोन दिवसांपासून घरी आला नसल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.