Representational Image (Photo Credits: File Photo)

Meerut Murder Case: उत्तर प्रदेशातील मेरठमधील सोहेल गार्डन येथील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित असलेले वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी पोलिसांना लिसारी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरात एका दाम्पत्याचे आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यातील एका मृतदेहाचे पाय चादरीने बांधलेले होते, अशी माहिती टाडा यांनी दिली. जड वस्तूने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. हेही वाचा: Hardeep Nijjar Murder Case: हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप असलेल्या चार भारतीय नागरिकांना जामीन मंजूर

दरम्यान, ज्या पद्धतीने घराला बाहेरून कुलूप लावण्यात आले त्यावरून हल्लेखोर ओळखीचा असल्याचे स्पष्ट झाले असून काही वैमनस्यातून ही घटना घडली असावी, असे त्यांनी सांगितले. या घटनेच्या तपासासाठी गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती टाडा यांनी दिली. श्वान पथकाचीही मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांचे मृतदेह सापडले ते एकाच कुटुंबातील असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मोईन, त्याची पत्नी आसमा आणि त्यांची तीन मुले अफसा (८), अजीजा (४) आणि आदिबा (१) अशी मृतांची नावे आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, मोईनचा भाऊ सलीम पत्नीसह त्याला भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मुलांचे मृतदेह बेड बॉक्समध्ये पोत्यात भरून ठेवले होते आणि मोईन आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळले.