Transgenders Wedding Viral Video: छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील जाजगीर-चंपा (Janjgir-Champa) जिल्ह्यातील एका विवाहाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. तब्बल तीन दिवस चाललेल्या या विवाहसोहळ्यात पाच ट्रान्सजेंडर्स (Transgender ) आपल्या 'गुरु'सोबत लग्नबेडीत अडकले. सर्वार्थाने विशेष ठरलेल्या या ट्रान्स समुदायाच्या सर्व पारंपारिक चालीरीतींचे पालन करणाऱ्या या समारंभात तृतीयपंथीयांनी समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थनाही केली. भारतीय किन्नर समुदयाने या विवाहाचे आयोजन केले होते. या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अतिशय लक्षवेधी ठरलेल्या या विवाहसोहळ्यात सर्व विधी पार पाडण्यात आले. वर-वधू आणि उपस्थित ट्रान्सजेंडर्सनी एकमेकांना हळद लावली. विवाहासाठी खास असा भव्य मंडप उभारण्यात आला होता. तसेच, किन्नर समजातील विविध मंडळींनाही निमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे निमंत्रण नसतानाही अत्यंत प्रेमापोटी स्वखुशीने उपस्थित राहिलेल्या तृतीयपंथीयांची संख्या अधिक होती. (हेही वचाा, मुंबईत सुरु झाले पहिले ट्रान्सजेंडर सलून; नाव आहे Transformation, जाणून घ्या खासीयत)
"ट्रान्सजेंडर" हा शब्द अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो ज्यांची लिंग आधारीत ओळख ही त्यांना जन्मावेळी नियुक्त केलेल्या लिंगाशी जुळत नाही. जसे की, एखादी व्यक्ती, ज्याला जन्मावेळी लिंगसापेक्ष ओळखीनुसार पुरुष मानले जाते. मात्र, पुढे स्वतंत्र समज आल्यावर अथवा विकसीत होत गेल्यावर सदर व्यक्तीला आपण स्त्री असल्या भावना होते. तसेच, ती व्यक्ती महिलांप्रमाणे कपडे आणि आचरण करते. अशा वेळी सदर व्यक्तीला ट्रान्सजेंडर म्हणून ओळखले जाते. इंग्रजी भाषेत सामान्यपणे वापरला जाणारा ट्रान्सजेंडर हा शब्द विविध भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. जसे की मराठीत तृतीयपंथी, हिजडा, हिंदी भाषेत किन्नर वगैरे.
महत्त्वाचे असे की, ट्रान्सजेंडर असणे हा मानसिक विकार किंवा आजार नाही. त्यामुळे ट्रान्सजेंडर लोकांसोबत भेदभाव केला जाऊ नये. त्यांची लैंगिक ओळख व्यक्त करण्याचा आणि भेदभाव आणि हिंसाचारापासून मुक्त जीवन जगण्याच्या अधिकारासह ते इतर कोणाच्याही समान अधिकार आणि आदरास पात्र आहेत. असे असले तरी समाजातील काही घटक मात्र त्यांना आदराने वागणूक देत नाही. जे निशेधार्ह आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहेच.
व्हिडिओ
#WATCH | In a unique three-day-long wedding ceremony, five transgenders married their 'Guru' in Chhattisgarh's Janjgir- Champa district. The eunuchs also prayed for the welfare of society during the ceremony which followed all the traditional rituals of the trans community and… pic.twitter.com/SSEEFyrU3d
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 7, 2023
हे देखील नमूद करण्यासारखे आहे की ट्रान्सजेंडर असण्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. ट्रान्सजेंडर होण्यासाठी कोणताही असा विशेष मार्ग असत नाही. काही ट्रान्सजेंडर लोक त्यांच्या लिंग ओळखीची पुष्टी करण्यासाठी हार्मोन थेरपी आणि/किंवा शस्त्रक्रिया करणे निवडतात, तर इतर तसे करत नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्ती आपली लिंग ओळख अशा प्रकारे व्यक्त करू शकतात जी स्वतःला प्रामाणिक आणि सत्य वाटेल.