Transformation Salon in Mumbai: मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पहिले ट्रान्सजेंडर सलून (Transgender Salon) उभे राहिले आहे. ट्र्रान्सजेंडर समूहासाठी हे सर्वात मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. एकूण 7 ट्रान्सजेंडर (Transgender) व्यक्तींनी चालवलेले हे सलून इतरही ट्रान्सजेंडर वर्गासाठी प्रेरणा ठरले, असे बोलले जात आहे. जैनब यांनी पुढाकार घेऊन हे सलून सुरु केले आहे. उल्लेखनीय असे की, सलूनच्या मालक असलेल्या जैनब स्वत: ट्रान्सजेडर आहेत. ट्रान्सजेंडर म्हटलं की आजही आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात ते रस्ते, दुकाने चौक आणि रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला अरुंद गल्ल्या, उड्डाणपूल अशा दिव्यांच्या अंधूक प्रकाशात उभा राहणारे तृतीयपंथी. समाजातून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षीत झालेला एक मोठा वर्ग. ज्या वर्गाची स्वत:ची अशी एक वेगळीच दुनिया असते. अनेकांसाठी ही दुनिया कुतूहलाचा, काहींसाठी हेटाळणीचा विषय असतो. परंतू, या दुनियेला छेद देत ट्रान्सजेंडर समूह नवे पाऊल टाकत आहेत.
दरम्यान, जैनब यांनी मुंबईतील पहिल्या ट्रान्सजेंडर समूहाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हे सलून उभारण्यासाठी Deutsche Bank आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांनी मदतीचा हात पुढे गेला. या सलूनच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर समूहातून येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण आणि कामही मिळवून दिले जाणार आहे. या सलूनच्या माध्यमातून समूहातील लोकांना स्टार्स्टअप सुरु करण्याचीही प्रेरणा मिळेल. जेणेकरुन उपेक्षीत मानला जाणारा ट्रान्सजेंडर समाजही भविष्यात मोठी झेप घेण्यास सक्षम होईल, असे ते सांगतात. (हेही वाचा, First Transgender Publication: भारतातील सुर झाली पहिली पहिली ट्रान्सजेंडर प्रकाशन आणि चित्रपट कंपनी; घ्या अधिक जाणून)
ट्विट
Maharashtra| First salon run by transgender people opened in Mumbai (25/03) pic.twitter.com/XdKfYwqg6N
— ANI (@ANI) March 25, 2023
ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथी समाजातील लोकांसाठी मुख्य प्रवाहातील समाजव्यवस्थेत आजही कोणतेही स्थान दिले जात नाही. नोकरी, आरक्षण हे मुद्दे तर दूरच. पूर्वीतर ट्रान्सजेंडर समूहात शिक्षीत लोकच नव्हते. शिक्षणाचा अभाव असल्याने कौशल्यावर आधारीत, अथवा शैक्षणीक पात्रता पूर्ण करणाऱ्या नोकऱ्याच लोकांना मिळत नसत. आज परिस्थिती बदलली आहे. ट्रान्सजेंडर समूहातील लोकही प्रचंड शिकलेले आहेत. परिणामी आपल्या शिक्षणावर आधारीत आणि आपल्या वकूबानुसार ते नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्याचाच परिणाम म्हणजे एखाद्या ट्रान्सजेंडरने एखादी वाहतूक कंपनी काढलेली पाहायला मिळते तर एखादा ट्रान्सजेंडर एनजीओ चालवताना, लेखक झालेला पाहायला मिळतो.