Retail Inflation: जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर वाढून 6.93 टक्क्यांवर पोहोचला; महागल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

अन्न व पेय पदार्थांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने जुलैमध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) दर 6.93 टक्क्यांवर पोहोचला. गुरुवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित अन्नधान्य महागाई (Food Inflation) दरही वाढून जुलैमध्ये तो 9.62 झाला. यापूर्वी जूनमध्ये किरकोळ महागाई 6.23 टक्के होती. त्याच वेळी अन्नधान्य महागाई दर 8.72 टक्के होता. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) लक्ष्यापेक्षा जास्त आहे. महागाई 2-6 टक्क्यांपर्यंत रोखण्याचे सरकारने आरबीआयला लक्ष्य दिले आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे की, एनएसओच्या फील्ड ऑपरेशन्स विभागातील फील्ड कर्मचारी सामान्यत: 1,114 शहरी बाजारामध्ये आणि निवडक 1,181 खेड्यांमध्ये, साप्ताहिक रोस्टरच्या आधारावर वस्तूंच्या किंमतींचा डेटा गोळा करतात. एनएसओने म्हटले आहे की, जुलै महिन्यातील महागाईशी संबंधित विविध निर्बंध हळूहळू काढून टाकणे आणि गरजेच्या नसलेल्या गोष्टी पुन्हा सुरू केल्याने किंमतींच डेटाही वाढला. जुलैमध्ये 1,054 (95 टक्के) शहरे आणि 1,089 (92 टक्के) खेड्यांमधून वस्तूंच्या किंमतींचा डेटा गोळा केला गेला.

एएनआय ट्वीट -

किरकोळ महागाई ही मुख्यत: डाळ आणि उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने झाली आहे, जी जूनमध्ये वर्षाच्या तुलनेत 15.92 टक्क्यांनी वाढली आहे. डाळी व उत्पादनांच्या तुलनेत मांस व माशांच्या प्रकारांमध्ये 18.81 टक्के वाढ झाली आहे, तर तेल व दुग्धजन्य पदार्थांमध्ये 12.41 टक्क्यांनी व मसाल्यांच्या किंमतींमध्ये 13.27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या बाबतीतही 11.29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (हेही वाचा: टॅक्स भरणा-यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विशेष घोषणा; सांगितले टॅक्स सिस्टम फेसलेस आणि Taxpayers Charter आजपासून होणार लागू)

दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतही महागाईचा दर नोंदविला जाईल, असे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले होते. पण यानंतर त्यामध्ये घट होणेही अपेक्षित आहे. सध्याच्या कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशांतर्गत महागाई दारात वाढ झाली आहे.