सर्व देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) Transparent Taxation- Honouring The Honest या कार्यक्रमात मोदींनी टॅक्स भरणा-यासांठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. प्रामाणिकपणे टॅक्स भरणा-या लोकांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यासाठी करप्रणाली मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आजपासून टॅक्स सिस्टम फेसलेस आणि Taxpayers Charter लागू करण्याची गोषणा केली. यासोबत करप्रणाली संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना लोकांशी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'देशात सुरु असलेला Structural Reforms एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. यासाठी 21 व्या शतकात कर प्रणातील काही नवीन बदल करण्यासाठी हा लोकार्पण सोहळा आज करण्यात आला.' प्रामाणिक करदाता राष्ट्र निर्मितीत मोठी भूमिका बजावत असतो. त्यामुळे करदात्याचे जीवन सोपे झाले तर देशाचा विकास होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी Transparent Taxation लॉन्चिंग कार्यक्रमात म्हणाले.
इस प्लेटफॉर्म में Faceless Assessment, Faceless Appeal और Taxpayers Charter जैसे बड़े रिफॉर्म्स हैं।
Faceless Assessment और Taxpayers Charter आज से लागू हो गए हैं: PM @narendramodi #HonoringTheHonest
— PMO India (@PMOIndia) August 13, 2020
पंतप्रधान नोदी असेही म्हणाले की, या प्लेटफॉर्म मध्ये फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टर सारखे मोठे रिफॉर्म्स आहेत. फेसलेस असेसमेंट आणि टॅक्सपेयर्स चार्टर आजपासून लागू होतील.
यातील फेसलेस अपील सुविधा 25 डिसेंबरला म्हणजेच दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मदिनादिवशी संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी उपलब्ध केली जाईल. आता जरी चॅक्स सिस्टम फेसलेस होत असला तरीही, करदात्यांना यात विश्वासार्हता वाटेल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.