PM Narendra Modi | Photo Credits: Twiiter/ ANI

भारतामध्ये 80% कोरोनारूग्ण असलेल्या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारा संवाद साधला आहे. यावेळेस देशामध्ये कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी 72 तासांचा फॉर्म्युला दिला आहे. नरेंद्र मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ञांच्या मते सुरुवातीच्या 72 तासांमध्ये कोविड 19चे निदान करण्यास यश आल्यास त्याचा फैलाव रोखण्यापासून मदत होते. त्यामुळे आता देशात पहिल्या 72 तासांमध्ये कोरोनाचे निदान करण्यासोबतच रूग्नांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्सना देखील तात्काळ तपासण्याची गरज आहे. त्याकडे भर द्या अशा सूचना आहेत. दरम्यान आज या बैठकीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, युपी, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता.

नरेंद्र मोदी यांनी यावेळेस बोलताना देशामध्ये हळूहळू लोकांमधून कोरोनाची भीती कमी होत आहे. नियमांमध्ये शिथिलता येत आहे. पण यामधून संसर्ग वाढू नये म्हणून अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. दरम्यान देशामध्ये कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक कडक नियम लावणं गरजेचे आहे. शक्य असल्यास मिनी कंटेन्मेंट करून संचारबंदी अशा भागांमध्ये अधिक कडक बनवा.अशा सूचना दिल्या आहेत.

ANI Tweet

Experts are saying now that if within 72 hours, a person is diagnosed, then the spread can be controlled to a great extent. So, it is important that all the people who come in contact with an infected person must be tested within 72 hours: PM Modi. #COVID19 pic.twitter.com/7FqMSXunoF

येत्या काही दिवसांत देशात कोरोना चाचणीचे प्रमाण सातत्याने वाढवण्यात आले आहे. दरम्यान आता गुजरात, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये टेस्टिंग वाढवले जाणार आहे. जितक्या वेगाने आणि लवकर कोरोनाचे निदान होईल तितका त्याचा प्रसार रोखायला मदत होणार आहे असे सांगत मोदींनी टेस्टिंगवर भर देण्याचाही मंत्र पुन्हा आरोग्य प्रशासनाला देण्यात आला आहे.

दरम्यान देशात महाराष्ट्र, गुजरात, युपी, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि पंजाब या 10 राज्यांमध्ये 80% अ‍ॅक्टीव्ह केसेस आहे. या राज्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवलं तर आपोआपच भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळणार आहे. त्

महाराष्ट्रात देशातील 30% कोरोनारूग्ण आहेत.